न्यास विश्वस्तांसाठी
मंगळवारी कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २५ ः सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व श्री दत्त मंदिर, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत न्यासांच्या विश्वस्तांसाठी मंगळवारी (ता. १) सकाळी १० वाजता श्री दत्त मंदिर, माणगाव (ता. कुडाळ) येथे विश्वस्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नोंदणीकृत न्यासांच्या सर्व विश्वस्तांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे सहायक धर्मादाय आयुक्त ए. जी. कुलकर्णी यांनी केले आहे. या कार्यशाळेस कोल्हापूरचे धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार, सहायक धर्मादाय आयुक्त अवंतिका कुलकर्णी, कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराम नाईकवाडे, कोल्हापूरचे विधिज्ञ प्रवीण कदम, सनदी लेखापाल जयंती कुलकर्णी यांचे मार्गदर्शन होणार आहे, असे सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.