कोकण

कवी अरुण म्हात्रेंचे विद्यार्थ्यांशी हितगुज

CD

53857

कवी अरुण म्हात्रेंचे विद्यार्थ्यांशी हितगुज
परुळे शाळेत ‘संवाद’ः कविता, गाणी, विनोदी चुटकुल्यांनी रंगत
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २७ः मराठी भाषेचे आघाडीचे कवी अरुण म्हात्रे यांनी तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रशालेच्या ‘संवाद’ या चर्चासत्राचे पुष्प गुंफण्यासाठी बुधवारी (ता. २६) उपस्थित असलेले कविवर्य म्हात्रे यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांशी कविता, गाणी व विनोदी चुटकुले यांच्या स्वरुपात संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
याप्रसंगी कवी म्हात्रे यांनी स्वरचित अनेक कवितांचे ताला-सुरात गायन केले. त्यासोबतच मराठी भाषेचे कवी मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, बालकवी, साने गुरुजी अशा अनेक सुप्रसिद्ध कवींच्या कविता आपल्या उत्कृष्ट शैलीमध्ये सादर केल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या तालबद्ध टाळ्यांच्या ठेक्यांनी त्यांना उत्तम साथ दिली.
आपली कविता लेखन कला विकसित करण्यासाठी भरपूर वाचन करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपले आई-वडील, मराठी भाषा, मराठी भाषेचे कवी आणि आपल्या देशावर आपली निष्ठा व प्रेम असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी स्वलिखित व संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या ‘उंच माझा झोका’ या मालिकेचे शीर्षक गीत सादर केले.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. उमाकांत सामंत, संस्था सीईओ अमेय देसाई, मुख्याध्यापक सचिन माने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रभू पंचलिंग यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Raghu Sharma? मुंबई इंडियन्सने क्रीडा आहारतज्ज्ञ अन् ट्रेनरला दिली पदार्पणाची संधी; CSK विरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार

HSC Exam Result : बारावी निकालात सलग दुसऱ्या वर्षी घट; मंगळवेढ्याचा निकाल 80 टक्के

मुंबईत महागाईचा स्फोट! वडापावपासून चहापर्यंत... रेस्टॉरंट मालकांनी किंमती वाढवल्या, जाणून घ्या सध्याचे दर

Vaibhav Sooryavanshi : वैभव 'बालमजूर'; त्याने क्रिकेटपेक्षा अभ्यासावर लक्ष द्यावे! राजस्थान रॉयल्सविरुद्ध FIR दाखल होणार? Video

FDA Rule: ग्राहकांची फसवणूक थांबणार! मेनू, बिल आणि डिस्प्लेवर पनीरची खरी माहिती द्यावीच लागणार, FDA चा कडक नियम लागू

SCROLL FOR NEXT