Vaibhav Sooryavanshi child labour controversy IPL full story
esakal
FIR against Rajasthan Royals young player case details: वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Soorayvanshi) हे आता केवळ नाव राहिले नाही, तर तो क्रिकेटचा सुपर स्टार झाला आहे. १५ वर्षांच्या फलंदाजाचा खेळ पाहण्यासाठी लोकं टीव्हीसमोर चिटकून बसू लागले आहेत. त्याची आक्रमक फटकेबाजी चर्चेचा विषय राहिली आहे आणि त्याने चाहत्यांना फार कमीवेळा निराश केले आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्येही तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत स्पर्धकांना तोडीसतोड टक्कर देताना दिसतोय. पण, १५ वर्षीय वैभवला खेळवण्यावरून आता राजस्थान रॉयल्स अडचणीत आला आहे. एका समाजसेवकाने राजस्थानविरुद्ध पोलिस स्थानकात FIR दाखल केले आहे.