कोकण

सावंतवाडी शहरात उभारला छ. संभाजी महाराजांचा पुतळा

CD

54089
सावंतवाडी शहरात उभारला
छ. संभाजी महाराजांचा पुतळा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः शहरातील कारागृहाच्यामागे छत्रपती संभाजी चौकात आज पहाटे अज्ञातांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. उद्या (ता.२९) संभाजी महाराजांचा बलिदान दिन साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर हा पुतळा उभारण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
शहरातील ज्या चौकात हा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे, त्या ठिकाणी गेले महिनाभर दररोज सायंकाळी ७:३० ते ८ या वेळेत अर्धा तास बलिदान मास प्रार्थना सुरू आहे. त्याचा समारोप उद्या होत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील संभाजी महाराजप्रेमींकडून हा पुतळा आज पहाटे उभारण्यात आल्याचे बोलले जात आहे. एकूणच पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तात्काळ याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. शिवाय शहरातील नगरपालिका प्रशासनालाही याची कल्पना दिली आहे. पुतळा उभारल्याप्रकरणी शहरातील काही संभाजी महाराजप्रेमींना तशाप्रकारच्या नोटिसाही बजावल्या आहेत. मात्र, हा पुतळा नेमका कोणी उभारला, हे मात्र समजू शकले नाही. एकूणच संभाजी महाराज चौकात त्यांचाच पूर्णाकृती पुतळा उभारल्याने संभाजी महाराजप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OCI Card New Rule: नागरिकत्व नियमांत मोठा बदल! अल्पवयीन मुलांच्या पासपोर्टवर मोठी बंदी; OCI साठी नवे डिजिटल नियम लागू

Navi Mumbai Drug Racket : शांताबाई करंडेकर टोळीचा गेम ओव्हर! दिघ्यात लेडी डॉनचं साम्राज्य उद्ध्वस्त करत पोलिसांनी अवैध मालमत्तेवर फिरवला बुलडोझर

Latest Marathi News Live Update : बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू, रुग्णांना मोठा दिलासा

Mumbai: प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच! प्लॅटफॉर्म- लोकलमधील अंतराचा धोका; अनेक स्‍थानकांवर उपाययोजनांकडे दुर्लक्ष

महिन्यात राज्यभरात १४ भोंदूबाबांवर गुन्हे, खरात प्रकरणानंतर प्रकार उघड

SCROLL FOR NEXT