कोकण

कुडाळेश्वर मंदिरात उद्यापासून श्रीरामनवमी महोत्सव

CD

५४०९४

कुडाळेश्वर मंदिरात उद्यापासून श्रीरामनवमी महोत्सव
विविध कार्यक्रम ः ८ एप्रिलपर्यंत आयोजन, लाभ घेण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः श्री देव कुडाळेश्वर-श्रीरामनवमी महोत्सव, कुडाळतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिरात ३० ते ८ एप्रिलपर्यंत श्रीरामनवमी महोत्सव होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
होणारे नित्य कार्यक्रम असे ः सकाळी ८ ते १२ श्रींच्या पाषाणमूर्तीवर लघुरूद्र अभिषेक, सायंकाळी ७ वाजता आरती व मंत्रपुष्पांजली, रात्री ८ वाजता पुराण वाचन, ८.४५ वाजता श्रींची पालखी मिरवणूक, १० वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीचे आगमन, कीर्तन व आरती. विशेष कार्यक्रम असे ः ३० ला दुपारी १२ वाजता गुढीरोहण, पूजन, नववर्ष फलवाचन, सायंकाळी ४.३० वाजता वालावलकर दशावतारी नाटक मंडळींचे पौराणिक नाटक दिनांची माऊली, ३१ ला सायंकाळी ४.३० वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचे पौराणिक नाटक भूताचे लग्न, १ एप्रिलला सायंकाळी ४.३० वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचे पौराणिक नाटक पिठजा देवी, २ ला सायंकाळी ४.३० वाजता (कै.) बाबी कलींगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांचे पौराणिक नाटक विधी संकेत, ३ ला सायंकाळी ४.३० वाजता चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ, कवठी यांचे पौराणिक नाटक साक्षात्कार-गणेश महिमा, ४ ला सायंकाळी ५ वाजता श्री देव कुडाळेश्वर महिला मंडळ आयोजित जल्लोष नृत्यांचा, ५ ला सायंकाळी ४.३० वाजता संकल्प क्रिएशन अंतर्गत कुडाळेश्वर महिला दशावतार नाटक कांचनगंगा, ६ ला श्रीरामनवमी (रामजन्म सोहळा), सकाळी ७ वाजता लघुरुद्र (सर्व ग्रामस्थांच्यावतीने) भक्तिसंगीत (सतीश कुंटे), सकाळी १० वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीचे आगमन, पुराणवाचन, ह. भ. प. प्रशांत धोंड बुवा यांचे कीर्तन, दुपारी १२.१५ वाजता श्रीरामजन्म व प्रसाद (सुंठवडा) आणि श्रींची पालखी मिरवणूक, सायंकाळी ४.३० वाजता वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ, तेंडोली यांचा महान पौराणिक ट्रिक सिन्सयुक्त नाट्यप्रयोग अयोध्याधीश श्रीराम, रात्री ९ वाजता श्रीराम श्रींची पालखी मिरवणूक, १०.३० वाजता श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ आयोजित एक नाटिका आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना, १२.३० वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ला यांचे पौराणिक नाटक डंबक गरुडाक्ष कणेंद्रभक्ष, ७ ला सायंकाळी ४.३० वाजता संकल्प क्रिएशन डान्स अॅकॅडमी, कुडाळ प्रस्तुत नृत्यरंग, ८ ला सकाळी १० वाजता एकादशी-श्रीरामराज्याभिषेक पट्टाअभिषेक, नवग्रहशांती, सप्तसिंधू जलकुंभधारी श्रीहनुमंत रांगोळी चित्रप्रतिमेचे पूजन, दुपारी ३ वाजता श्रींची पालखी मिरवणूक, सायंकाळी ४.३० वाजता पार्सेकर दशावतारी नाटक मंडळींचे पौराणिक नाटक महावीर बर्बरीक, रात्री ८.४५ वाजता श्रींची पालखी मिरवणूक, ९.४५ वाजता कीर्तन-लळीत ह. भ. प. विश्वनाथ उर्फ भाऊ नाईक, ११.३० वाजता श्री देव कुडाळेश्वर मित्रमंडळ आयोजित निमंत्रितांचे ग्रुप डान्स डान्सिंग नाईट. सर्व भाविकांनी वरील कार्यक्रमांना उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन श्रीरामनवमी महोत्सव समितीने केले आहे.


कीर्तन महोत्सव
रविवारी (ता. ३०) रात्री १०.१५ वाजता ह. भ. प. विश्वनाथ उर्फ भाऊ नाईक, ३१ ला ह. भ. प. श्री. स्नेहलदीप सामंत, हुमरमळा, १ एप्रिल ह. भ. प. अवधूत धुपकर, २ ला ह. भ. प. श्री. अवधूत धुपकर, ३ ला ह. भ. प. रामचंद्रबुवा उर्फ काका मेस्त्री, ४ ला ह. भ. प. मकरंद देसाई, ५ ला ह. भ. प. प्रशांत धोंड, ६ ला ह. भ. प. प्रशांत धोंड, ७ ला ह. भ. प. विश्वनाथ उर्फ भाऊ नाईक, ८ ला ह. भ. प. विश्वनाथ उर्फ भाऊ नाईक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Crime News: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT