कोकण

माजगाव येथे आज नाटक

CD

बौद्ध हितवर्धक संघातर्फे
वेंगुर्लेत वधू-वर मेळावा
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाच्या वतीने साई मंगल कार्यालय सुंदर भाटले बस स्थानक रोड वेंगुर्ले ६ एप्रिलला
सकाळी ९.३० ते ३.३० वाजेपर्यंत वधू-वर, पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ, दोडामार्ग आणि गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर परिचय मेळावा घेऊन उपवर मुला मुलींना अनुरूप स्थळ निवडता यावे, म्हणून हा प्रयत्न करण्यात येत आहे. यावेळी उद्‌घाटन, स्वागत व वधू-वर मेळावा, दुपारी स्नेहभोजन, अध्यक्षांचे मनोगत, समारोप होईल. वधू-वर मेळाव्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. वधू-वर नोंदणी फी प्रत्येकी दोनशे रुपये राहील. वधू-वरासोबत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी १०० रुपये शुल्क असेल. बौद्ध वधू-वर यांनी बौद्ध असल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. वधू-वर यांच्या वयाच्या पुरावा शाळा सोडल्याचा दाखला आणि शैक्षणिक पात्रता गुणपत्रक प्रमाणपत्र यांच्या झेरॉक्स तसेच पासपोर्ट फोटो आवश्यक आहेत, असे आवाहन सावंतवाडीचे अध्यक्ष महेंद्र सावंत, वेंगुर्लेचे अध्यक्ष प्रेमानंद जाधव, कुडाळचे अध्यक्ष अनिल पावसकर, दोडामार्ग अध्यक्ष शंकर जाधव व गोवा विभागाचे अध्यक्ष तुकाराम तांबोसकर यांनी केले आहे.

आचऱ्यात ११ ला
रेकॉर्ड डान्स स्पर्धा
आचरा ः श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त आचरा पिरावाडी येथे ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर पुरस्कृत, श्री तरुण संघ आणि हनुमान मंदिर न्यास आचरा पिरावाडीतर्फे ११ एप्रिलला रात्री १० वाजता पिरावाडी हनुमान मंदिर येथे राज्यस्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी अनुक्रमे ११ हजार १११, ७ हजार ७७७, ५ हजार ५५५ व प्रत्येकी आकर्षक चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. उत्तेजनार्थ ३ हजार ३३३ व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. ५ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रसाद केळूस्कर, निमिष बापर्डेकर, संतोष जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री तरुण संघ दक्षिणवाडा आणि हनुमान मंदिर न्यास आचरा पिरावाडी दक्षिणवाडाकडून करण्यात आले आहे.

सावंतवाडीत
उद्या शोभा यात्रा
सावंतवाडी ः येथील आरंभ सखी ग्रुपच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागतासाठी रविवारी (ता.३०) शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा प्रारंभ सायंकाळी ५ वाजता राजवाडा येथून सावंतवाडी संस्थानच्या श्रीमंत शुभदादेवी भोसले आणि युवाराणी श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ही शोभायात्रा गांधी चौक, जयप्रकाश चौकाकडून पुढे जात जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाकडे समारोप होणार आहे. यात महिला ढोल-पथक, लाठी-काठी पथक, लेझीम पथक यांचा समावेश असून, टाळ नृत्य, पोवाडा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. या शोभा यात्रेत सावंतवाडी परिसरातील सर्व हिंदू बंधू आणि भगिनींनी पारंपरिक पोशाखात उपस्थित राहावे, असे आवाहन आरंभ सखी ग्रुपच्या पल्लवी रेगे, देवता हावळ, संजना देसकर, दर्शना रासम, संगीता शेलटकर आणि नेहा मडगावकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

Latest Marathi News Live Update : पाषाण तलावातील मृत मासे प्रकरण! महापौरांचा दौरा, प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे आदेश

गरोदर असूनही ‘राका’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण करणार अ‍ॅक्शन सीन ! अभिनेत्रीची विशेष मेहनत

‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये मराठमोळ्या श्वेता साकोडेची दमदार एन्ट्री; महाराष्ट्रीयन पदार्थांनी जिंकली परीक्षकांची मनं

Management Education: मॅनेजमेंट शिक्षणातील 'जेंडर गॅप': महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी बिझनेस स्कूल्स उचलत आहेत मोठी पावले

SCROLL FOR NEXT