54108
सावंतवाडी टर्मिनसबाबत
पालकमंत्री राणेंना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री संपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरेमंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांची भेट घेतली.
यावेळी सावंतवाडी टर्मिनस, सावंतवाडी स्थानकातील प्रवासी सुविधा, अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा, अमृत भारत योजना आदी विषयांकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. पालकमंत्री राणे यांनी हा विषय खासदार नारायण राणे स्वतः हाताळत असून, यावर ते लक्ष ठेवून आहेत. लवकरच सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. हा विषय खासदारांना माझ्यापरीनेदेखील सांगेन, असा शब्द पालकमंत्री राणे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. सावंतवाडीच्या विकासासाठी सर्वजण कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी नमूद केले. पालकमंत्र्यांनी संघटनेच्या मागण्या नीट समजून घेऊन पुढील कार्यवाही करण्याबाबत आश्वस्त केले. प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पालकमंत्री राणेंचे आभार मानले. यावेळी प्रवासी संघटनेचे सल्लागार सुभाष शिरसाट, तेजस पोयेकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.