कोकण

पोकलेन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

CD

पोकलेन चालकाची
मुरूड येथे आत्महत्या
दापोलीः तालुक्यातील मुरूड येथील जंगलात पोकलेन चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरूडचे माजी सरपंच सुरेश शंकर तुपे यांनी मुरूड गावातील सडा येथे तलाव खणण्याचे काम घेतले होते. त्यासाठी त्यांनी भाड्याने एक पोकलेन घेतला होता. त्यावर राजू नामदेव पवार (वय ३६, रा. कुन्नूर, विजापूर) हा चालक म्हणून काम करत होता. १२ मार्चला सकाळी ९.३० च्या सुमारास या पोकलेनचा प्रेशर पाईप फुटल्याने तो आणण्यासाठी राजू पवार गेला होता तो परत आलाच नव्हता. २७ मार्चला सायंकाळी पाचच्या सुमारास तलावाचे खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणासमोरील जंगलातून उग्र वास येत होता. त्यामुळे पोलिस पाटील व अन्य ग्रामस्थांनी तेथे जाऊन पाहिले असता त्यांना झाडाच्या फांदीला गळफास घेतलेल्या अवस्थेत एकजण आढळून आला. त्या व्यक्तीने परिधान केलेल्या कपड्यावरून व तेथे पडलेल्या पोकलेनच्या किल्लीवरून तो मृतदेह राजू पवार याचाच असल्याची माहिती तुपे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

Latest Marathi News Live Update : पाषाण तलावातील मृत मासे प्रकरण! महापौरांचा दौरा, प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे आदेश

गरोदर असूनही ‘राका’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण करणार अ‍ॅक्शन सीन ! अभिनेत्रीची विशेष मेहनत

‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये मराठमोळ्या श्वेता साकोडेची दमदार एन्ट्री; महाराष्ट्रीयन पदार्थांनी जिंकली परीक्षकांची मनं

Management Education: मॅनेजमेंट शिक्षणातील 'जेंडर गॅप': महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी बिझनेस स्कूल्स उचलत आहेत मोठी पावले

SCROLL FOR NEXT