रत्नागिरी पॉलिटेक्निकला प्रथम क्रमांक
परशुराम महाविद्यालयात स्पर्धा ; १५ प्रकल्प सादर
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ३० : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात ''प्रकल्प २०२५'' ही प्रोजेक्ट स्पर्धेत रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतनच्या संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या जार्वीस एआय असिस्टंट (Jarvis AI assistant) या प्रोजेक्टला हे पारितोषिक मिळाले आहे.
ही स्पर्धा डिप्लोमा (अभियांत्रिकी पदविका) विद्यार्थ्यांसाठी होती. स्पर्धेसाठी डॉ. आर. डी. कुलकर्णी आणि अशोककुमार यादव हे दोन सीनियर सायंटिस्ट परीक्षक होते. भाभा परमाणू संशोधन केंद्र (बीएआरसी) आणि न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञांची एक तुकडी महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाला वर्षातून दोनदा भेट देते आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. या स्पर्धेसाठी चिपळूण ते अगदी तळकोकण सावंतवाडीपर्यंतच्या अनेक डिप्लोमा महाविद्यालयांमधून जवळपास १५ प्रोजेक्ट समूह आपापले प्रोजेक्ट्स घेऊन उत्साहाने सहभागी झाले होते. स्पर्धेत शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरीतील संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या जार्वीस एआय असिस्टंट या प्रोजेक्टला प्रथम पारितोषिक म्हणून १० हजार रुपये देण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिकही रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतनमधील संगणक अभियांत्रिकीच्या रिलोकेट आयओ या प्रकल्पाला मिळाले. त्यांना सात हजार रुपये देण्यात आले. सह्याद्री पॉलीटेक्निकमधील एसपीएस हब आणि सीएनसी पेन प्लॉटर या दोन ग्रुपला तृतीय क्रमांक विभागून मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.