कोकण

फोटोफीचर

CD

फोटो स्टोरो

रत्नागिरीतील मोकाट गुरांचा प्रश्न जैसे थे च!

रत्नागिरी शहरात मोकाट गुरांचा प्रश्न जैसे थे आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यात नगरपालिका अपयशी ठरलेली आहे. रस्त्यावरील मोकाट गुरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि अपघातही होतात. यापूर्वी पालिकेमार्फत मोकाट गुरांना पकडण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती. पकडलेली गुरे ठेवण्यासाठी चंपक मैदान येथे कोंडवाडाही तयार करण्यात आला. त्यावर लाखो रुपये खर्चही करण्यात आले; मात्र हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे शहरात गुरे अजूनही मोकाटच आहेत. शुक्रवारी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत शहरातील मोकाट गुरांचा शहरात असलेला वावर याच छायाचित्राद्वारे मागोवा घेण्यात आला आहे. यामध्ये खाद्य मिळत असलेल्या ठिकाणीच मोकाट गुरे तळ टाकून ठेवत असल्याचे चित्र दिसते.

फोटो ओळी
rat4p13.jpg-
25N55446
रत्नागिरी : शहरातील हेड पोस्ट ऑफिससमोर रस्त्यावरच ठिय्या देऊन बसलेली मोकाट गुरे.
rat4p14.jpg-
25N55447
रत्नागिरी : कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बसलेल्या गुरांचा त्रास येथील कर्मचाऱ्यांना होतो.
rat4p15.jpg-
25N55448
रत्नागिरी : शहरातील मुख्य रस्त्यावर आठवडा बाजार येथे गुरांचा राबता कायम असतो. त्यामुळे वाहतुकीला अडचण होते असते.
rat4p16.jpg-
P25N55449
रत्नागिरी : मिरकरवाडा येथे रस्त्याशेजारी टाकलेला कचरा खाण्यासाठी जमलेली गुरे.
rat4p17.jpg-
25N55450
रत्नागिरी : लक्ष्मी चौकानजीक साचलेल्या कचऱ्यात बसलेले मोकाट कुत्रे व बैल. (मकरंद पटवर्धन, सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT