कोकण

कणकवली ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची सोडत

CD

कणकवली ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची सोडत

इच्छुकांची प्रतीक्षा वाढली, थेट लढती होणार असल्याने चुरश शक्य

कणकवली,ता. ४ ः तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी (ता.८) सकाळी ११ वाजता कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात होणार आहे. चिठ्या काढून सोडत पद्धतीने हे पुढील पाच वर्षांसाठीचे सरपंच आरक्षण निच्छित होणार आहे. यात सर्व प्रवर्गातून महिला पदे ५० टक्के राखीव राहतील. याखेपस सरपंच पदासाठी थेट लढती होणार असल्याने आरक्षणामुळे इच्छुकांची प्रतीक्षा वाढली.
तालुक्यातील ६३ ग्रामपंचायती पैकी ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका २०२२ मध्ये झालेल्या आहेत. तर तीन ग्रामपंचायतीच्या निवडणूका २०२१ मध्ये झाल्या आहेत. यातील बहुतांशी सरपंच पदे ही थेट निवडणूकीतून आहेत. आत नव्याने आरक्षण झाल्यानंतर येत्या काळात मुदत संपणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणूका ही थेट जनतेतून निवड होणार आहेत. त्यामुळे या आरक्षणाला अधिक म्हत्व असून इच्छूकांची यात कस लागणार आहे.
तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींपैकी ५ ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असणार असून त्यात दोन संबंधित प्रवर्गासाठी व त्या प्रवर्गातील तीन महिलांसाठी आरक्षणीत असणार आहे. नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी १७ पदे आरक्षीत होणार असून त्यात ८ प्रवर्गासाठी व ९ महिलांसाठी असणार आहेत. तर उर्वरीत ४२ सरपंच पदे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार असून त्यात २१ पदे ही सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षीत होणार आहेत.
ग्रामपंचायत सरपंच पदाला अलिकडे विशेष महत्व आहे. केंद्र आणि राज्य शासनाचा निधी थेट ग्रामपंचायतीला दिला जातो. तो खर्च करण्याचा अधिकार जरी ग्रामसभेला असला तरी सरपंच याना येथे विशेष अधिकार आहेत. सरपंच पदासाठी अविश्वास आणताना ग्रामसभेला अधिकार आहेत. त्यामुळे सदस्य पदाला फारसे अधिकार न राहील्याने थेट जनतेतून निवडून येणाऱ्यांना आरक्षण म्हत्वाचे आहे. त्यामुळे सरपंच आरक्षण सोडतीला इच्छूकांची गर्दी होणार असून तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी जि.प., पं.स. सदस्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.
--------------
असे आहे आरक्षण
- अनुसूचित जाती - ५ ग्रा.प.
- ओबीसी - १७ ग्रा.प.
- सर्वसाधारण - ४२ ग्रा.प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT