राजापूर कुणबी पतपेढीला
१ कोटी ५८ लाखाचा नफा
राजापूर, ता. ४ ः राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीने आर्थिक वर्षामध्ये १ कोटी ५८ लाख इतका निव्वळ नफा कमविला आहे. वर्षभरामध्ये १३२ कोटी २२ लाखाचा एकत्रित व्यवसाय करताना गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी एकत्रित व्यवसायात १४ टक्के इतकी वाढ झाल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी दिली आहे.
राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या आर्थिक वर्षातील लेखाजोखा श्री. मांडवकर यांनी पत्रकार परिषदेत मांडला. या वेळी उपाध्यक्ष प्रकाश लोळगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर आदी उपस्थित होते. श्री. मांडवकर म्हणाले, २०२४-२५ या आर्थिक वर्षात सभासद संख्येमध्ये १३ टक्केने वाढ झाली असून एकूण सभासद संख्या १४ हजार ४३८ इतकी झाली. ठेवी ७७ कोटी ९५ लाख तर, कर्ज ५४ कोटी २७ लाख तर, खेळते भांडवल १०५ कोटी ५५ लाखाने, तर एकत्रित व्यवसाय १३२ कोटी २२ लाख इतका झाला आहे. पतसंस्थेला यावर्षी ढोबळ नफा २ कोटी ६५ लाख तर, निव्वळ नफा १ कोटी ५८ लाख इतका झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.