भोके येथे ११ हजाराची घरफोडी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी ः शहरातील भुरट्या चोरट्यांनी आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळवल्याचे चित्र आहे. भोके येथील घराच्या उघड्या खिडकीतून आत शिरून चोरट्यांनी ११ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पळवला. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ ते ३ मार्च सकाळी सातच्या सुमारास भोके येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मैथिली योगेश गावडे (वय २३, रा. निवळी गावडेवाडी, ता. रत्नागिरी) यांची आई ही घरी नसताना अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश करून लोखंडी कपाटातील ५ हजार ५०० रोख व ५ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने असा ११ हजार १०० रुपयांवर डल्ला मारला. या प्रकरणी मैथिली गावडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
------
अपघात प्रकरणी मोटारचालकावर गुन्हा
रत्नागिरी ः शहरानजीकच्या कारवांचीवाडी फाटा येथे एसटी आणि मोटारीमध्ये अपघात झाला. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. मोटारीमधील प्रवाशांच्या दुखापतीस, एकाच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या संशयित कारचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमन दीपक अगरवाल (वय ३३, रा. दोस्ती पाईन, दोस्ती वेस्ट काऊंटी, बालकुम ठाणे (वेस्ट) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. ३) सकाळी साडेसहाच्या सुमारास कारवांचीवाडी फाटा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बसचालक रविकांत नानासाहेब मिसाळ हे बस घेऊन जात असताना कारवांचीवाडी फाट्याच्या पुढे हातखंबाहून रत्नागिरीकडे येणाऱ्या मोटारीतील संशयित चालकाने कार निष्काळजीपणे विरूद्ध दिशेला नेऊन एसटी बसला ठोकर दिली. या अपघातात प्रवासी किशोर प्रकाश तांदळे (३५, रा. साईश्रद्धा अपार्टमेंट पागझरे, ता. चिपळूण), सागर दीपक भादवे (३७, रा. चंपाषष्टी सोसायटी चेंबूर, मुंबई), रविकुमार नागारम (४४, रा. कालकन सोसायटी कासारवाडावली ठाणे-वेस्ट) यांच्या किरकोळ दुखापतीस तर विकास कोंडीबा नवसरे (रा. वाई सातारा, सध्या रा. एन्टॉप हिल मुंबई) यांच्या दुखापती व मृत्यूस कारणीभूत झाला. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल राजवैद्य यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
----
नाखरे येथील
वृद्धाचा मृत्यू
पावस ः तालुक्यातील नाखरे-भगवतीवाडी येथील प्रौढाला चक्कर आली. उपचारासाठी त्याला प्राथमिक आरोग्यकेंद्र पावस येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. संतोष यशवंत हरमले (वय ४३, रा. नाखरे-भगवतीवाडी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २) दुपारी तीन वाजता जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष हरमले हे घरी असताना त्यांना चक्कर आल्यासारखे झाले. तत्काळ त्यांना पावस आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.