

Maharashtra Auto Taxi Rule
ESakal
मुंबई : १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी भाषेत संवाद साधणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषा न आल्यास परवाने तात्काळ रद्द करण्याच्या नियमाला स्थगिती दिली आहे. परंतु परिवहन विभागाने ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी अधिक चांगल्या प्रकारे वागण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी एक विशेष निर्देश जारी केला आहे.