

India Test Team
Sakal
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून नुकतीच ताजी वार्षिक पुरुष कसोटी आणि महिला वनडे संघ क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आता काही मोठे बदल झाले आहेत. पण असे असले तरी ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे वर्चस्व मात्र कायम राहिले आहे. कसोटी क्रमवारीतही ऑस्ट्रेलियाचाच संघ अव्वल क्रमांकावर कायम आहे, तर महिला वनडे क्रमवारीतही ऑस्ट्रेलियाचाच संघ कायम आहे.