55576
‘वक्फ’च्या मंजुरीनंतर मालवणात जल्लोष
मालवण, ता. ४ : वक्फ सुधारणा विधेयक संसदेत बहुमताने मंजूर झाल्यानंतर मालवणात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाज यांच्यावतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी उपस्थितांनी केली.
यावेळी विलास हडकर यांनी विचार मांडले. राष्ट्रद्रोही शक्तींना लगाम लावणारे हे विधेयक आहे. मोदी सरकारचे अभिनंदन. विधेयकला पाठिंबा दर्शवणाऱ्या सर्वांचे आभारही यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी भाऊ सामंत, विजय केनवडेकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, दत्तात्रय नेरकर, ललित चव्हाण, शेखर गाड, अवी सामंत, बबन परुळेकर, आबा हडकर, संदीप बोडवे, हरीश पडते, प्रकाश करंगूटकर, गणेश चव्हाण, प्रसाद हळदणकर, स्वप्नील घाडी, मुकुंद घाडी, रजनीष पाल आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.