60011
भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव
आज कबड्डी स्पर्धा ः चार मे रोजी मुख्य कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ : येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव आयोजित केला आहे. विविध स्पर्धा व कार्यक्रमांनी हा सुवर्णमहोत्सव साजरा होत असून ४ मे रोजी सुवर्णमहोत्सवाचा मुख्य कार्यक्रम म्हणजेच माजी विद्यार्थी मेळावा व माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. भंडारी एज्युकेशन सोसायटी, भंडारी कनिष्ठ महाविद्यालय व माजी विद्यार्थ्यांनी ही माहिती दिली.
येथील भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेस भंडारी एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, लोकल कमिटी खजिनदार जॉन नरोना, लोकल कमिटी सदस्य दशरथ कवटकर, मुख्याध्यापक हणमंत तिवले, प्रा. पवन बांदेकर, प्रा. गुरुदास दळवी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी, माजी विद्यार्थी भूषण मेतर, अनिकेत फाटक, प्रविणा शिंदे, ललित चव्हाण, सिद्धेश चव्हाण, प्रा. अवसरे, नंदकिशोर मळेकर आदी उपस्थित होते.
सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त उद्या (ता. २७) प्रो- कबड्डी स्पर्धा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. तसेच ३ मे रोजी सकाळी हायस्कूल व महाविद्यालयात सकाळी धार्मिक कार्यक्रम, श्रींची महापूजा, सायंकाळी ४ वाजता माजी विद्यार्थिनींसाठी होममिनिस्टर-पैठणी स्पर्धा होणार आहे. मुख्य कार्यक्रमात ४ मे रोजी मामा वरेरकर नाट्यगृह येथे सकाळच्या सत्रात माजी विद्यार्थी मेळावा होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अध्यक्ष म्हणून भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर तसेच पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे आदी उपस्थित राहणार आहेत.
----
सांगता सोहळा जुलैमध्ये
यावेळी संस्थेच्या प्राथमिक शाळा, हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त शिक्षक, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेले माजी विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी, महोत्सवासाठी देणगी देणाऱ्यांचा सत्कार, स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव होईल. दुसऱ्या सत्रात दुपारी ३ वाजल्यापासून माजी व आजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. सांगता समारोप जुलैमध्ये होणार असून त्यानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येईल. सुवर्णमहोत्सव स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.