कोकण

ःदेवळे घाट यंदाही ठरणार वाहतुकीस धोकादायक

CD

-rat२६p८.jpg ः
25N60057
दाभोळे गावानजीक पुलाचे सुरू असलेले काम.
-rat२६p९.jpg
25N60058
ःसाखरपा ः घाटात सुरू असलेले काम.
-rat२६p१०.jpg
25N60055
ःघाटातील दरडप्रवण क्षेत्र.
-----
देवळे घाट यंदाही ठरणार यंदाही धोकादायक
दरड कोसळण्याची भीती ; पुलाचे बांधकामही अर्धवट, उपाययोजनेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २६ : मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही देवळे घाट वाहतुकीस धोकादायक ठरणार आहे. ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेले काम, सुरू असलेले खोदकाम, ढासळलेली माती यामुळे यंदाही पावसाळ्यात रस्त्यातून जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागणार आहेत.
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे देवळेफाट्यापासून दाभोळे गावापर्यंत असलेला घाट हा देवळेघाट म्हणून ओळखला जातो. अवघा साडेतीन किमीचा हा घाट आहे; पण आता महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. गेल्या वर्षी या घाटातून पावसाळ्यात वाहतूक अत्यंत धोकादायक झाली होती.
देवळेफाटानजीक जुन्या रस्त्याच्या कडेला डोंगरात जेसीबीने खोदकाम सुरू आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे सैल झालेली माती रस्त्यावर येऊन सर्वत्र चिखल पसरण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी दरडही कोसळून रस्त्यावर येण्याचा मोठा धोका आहे. टाक्याचा माळनजीक असलेले अवघड वळण रूंदीकरणात काढून टाकण्यात आले असले तरी उर्वरित रस्त्याचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे या सगळ्या परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरणार हे नक्की आहे.
दाभोळे गावाच्या बाहेरून हा महामार्ग जाणार आहे. त्यासाठी काजळी नदीवर लांजा रस्त्याच्यावरून पूल बांधण्याचे काम सुरू आहे. हे कामही गेल्या दीड वर्षांपासून अपूर्णच आहे. पुलाच्या खांबांचे काम दीड वर्षांपासून सुरू असले तरी ते अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे या परिसरातही रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
---
दृष्टिक्षेपात...
* साडेतीन किमीच्या भागाचे काम दीड वर्षांपासून अर्धवट
* ठिकठिकाणी डोंगराचे खोदकाम सुरू
* मातीच्या ढीगाऱ्यांमुळे चिखल पसरण्याची भीती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताची ३७ जहाजं होर्मुझमध्ये अडकून, देशात कच्च्या तेलाचा साठा किती? खतांचे काय? पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितली आकडेवारी

Pune Land Action: शर्तभंग झालेल्या ३० भूखंडांवर सरकारची मोठी कारवाई; पुणे-पिंपरीत कोट्यवधींच्या जमिनी ताब्यात, २०० कोटींची मालमत्ता जप्त

Latest Marathi News Live Update : दिल्लीत 'क्वाड'च्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

देऊळ बंद २ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, 5 दिवसात कमावले तब्बल 'इतके कोटी'

Chhatrapati Sambhajinagar: पैठणचे गोदापात्र पडले कोरडेठाक; घाण, कचरा सडून परिसरात दुर्गंधी; धार्मिक विधींना मोठा फटका

SCROLL FOR NEXT