‘त्या’ नाल्याबाबत नगरपंचायतीला पत्र
दापोली, ता. २६ ः दापोली नगरपंचायत हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील लाल कट्टा ते नगरपंचायत कार्यालयाच्या मागील भागातील नाल्याच्या दोन्ही बाजूना काँक्रिटची संरक्षक भिंत व तळाशी काँक्रिटचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र या नाल्याची रूंदी कमी करण्यात आली असल्याने पावसाळ्यात नगरपंचायतीच्या आवारात तसेच कर्मचारी वसाहतीत या नाल्यातील पाणी घुसण्याची शक्यता असल्याचे पत्र नगराध्यक्षा ममता मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. या संदर्भात ४ मार्चला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दापोली कार्यालयात पत्रव्यवहार करूनही हे काम अजून सुरूच आहे. त्यामुळे येणाऱ्या पूरपरिस्थितीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल, असा इशारा नगराध्यक्ष ममता मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना एका पत्राद्वारे दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.