

Transport Minister Speaks On ST Fare Hike
Esakal
गेल्या १० दिवसात पेट्रोलच्या किंमतीत ८ रुपयांची तर डिझेलच्या किंमतीत साडे सात रुपयांची वाढ झालीय. याचा फटका आता एसटी महामंडळालासुद्धा बसत आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या खर्चात वाढ झाल्याचं सांगताना तिकीट दरवाढीचे संकेत दिले आहेत. मात्र सद्यस्थितीला दरवाढ करण्यात आलेली नाही असंही स्पष्ट केलं. सध्या एसटी महामंडळाकडून डिझेल बचतीसाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. डिझेल बचतीचं उद्दिष्ट ठरवण्यात आल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. ST corporation faces huge losses due to diesel price hike fare increase likely