कोकण

मडुरा तिठा येथे ‘जय श्रीराम’चा नारा

CD

60044

मडुरा तिठा येथे ‘जय श्रीराम’चा नारा

श्री हनुमान मंदिराचे शिखर कलशारोहण

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ ः रोणापाल-मडुरा तिठा येथील दक्षिणाभिमुखी श्री हनुमान मंदिर शिखर कलशारोहण आणि मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना सोहळा भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. दाभोली मठाचे प. पू. दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या हस्ते शिखर कलश स्थापना व मारुती मूर्ती स्थापना करण्यात आली.
यावेळी ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या सोहळ्यानिमित्त गुरुवारी (ता. २४) सकाळी होमहवन व विविध धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी रामकृष्ण हरी संगीत गुरुकुल, तेंडोली यांचा ‘गीत रामायण’ हा कार्यक्रम झाला. शुक्रवारी (ता. २५) सकाळी ८.३० च्या मुहूर्तावर दाभोली मठाचे प. पू. दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या हस्ते शिखर कलश स्थापना पार पडली. त्यानंतर ९ वाजता मारुती मूर्ती स्थापना, प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी स्वामींची पाद्यपूजा, महापूजा, तत्वहोम, पूजांगहोम, क्षेत्रपाल बलिदान, महापुर्णाहुती, दुपारी महानैवेद्य, आरती, मंत्रपुष्पांजली, प्रार्थना, ब्राह्मण पूजन, आशीर्वाद व महाप्रसाद हे कार्यक्रम झाले. सायंकाळी जय संतोषी माता दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग झाला. या सोहळ्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. सोहळ्याचे श्री हनुमान देवस्थान समितीमार्फत नीटनेटके आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मुंबई, पुणे, गोवा येथील चाकरमान्यांसह मडुरा दशक्रोशीतील हजारो भाविक सोहळ्यात सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: 'काही गोष्ट स्पष्ट करायच्यात, माझ्या दुखापतीबद्दल बोलणारे...' सूर्याने सांगितलं सत्य नेमकं काय? फॉर्मवरही भाष्य

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT