60046
कणकवलीतील आठ जणांना
तायक्वाँदोमध्ये ‘ब्लॅक बेल्ट’
पनवेलमधील परीक्षेत मिळविले यश
कणकवली, ता. २६ : पनवेल येथे झालेल्या तायक्वाँदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत कणकवलीतील आठ जणांनी यश मिळविले. यामध्ये ओंकार मिलिंद पाटील, लीनेश सत्यवान कदम, वेदांत संतोष धनवटे, तर मुलींमध्ये सोनिया संजय ढेकणे, दुर्वा दिलीप सरूडकर, गार्गी अविनाश सावंत, दुर्वा संतोष गावडे, ऋतुजा राजेश शिरवलकर यांचा समावेश आहे.
यशस्वी सर्व विद्यार्थी कणकवली येथील नगरवाचनालय सभागृहात मास्टर स्पोर्टस् तायक्वाँदो ॲकॅडमी मार्फत सुरू असलेल्या तायक्वाँदो प्रशिक्षण वर्गात गेली पाच वर्षे राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक एकनाथ धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे तायक्वाँदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे पदाधिकारी व राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक भालचंद्र कुळकर्णी, सुधीर राणे, विनायक सापळे, अमित जोशी यांनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.