कोकण

रत्नागिरीत ''ए. आय. टूल्स'' कार्यशाळा

CD

महर्षी कर्वे महिला महाविद्यालयतर्फे
रत्नागिरीत ‘ए. आय. टूल्स’ कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ः एआय बद्दल जागरुकता निर्माण करणे. शाळेच्या प्रशासनात व अध्यापन प्रक्रियेत एआयचा सकारात्मक वापर कसा करता येईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे मुल्यांकन, अहवाल लेखन या कामामध्ये एआय टुल्सचा वापर करुन कार्यक्षमता कशी वाढवू शकतो याविषयी महर्षी कर्वे महिला महाविद्यालय आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने महाविद्यालयीन प्राचार्यांसाठी ‘एआय टुल्स’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा शहरातील मारुती मंदिर येथील हॉटेलमध्ये झाली.
कार्यशाळेत विविध हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सहभागी झाले होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत उस्फुर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात आश्रमगीत, दिपप्रज्वलन व भारतरत्न महर्षी कर्वे व बाया कर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते म्हणून एआय व मशीन लर्निंग या क्षेत्रात पंचवीस वर्ष कार्यरत असणारे एआय तज्ञ डॉ. आशिष तेंडुलकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. आशिष तेंडुलकर हे गुगल इंडिया मध्ये एआय अॅण्ड एमएल लिडर म्हणून कार्यरत आहेत. प्रशासन, अध्यापन व नियोजन या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या उपयोगाबाबत त्यांनी सविस्तर माहिती त्यांनी दिली. चाट जीपीटी, जेमेनी, नोटबुक एलएम, पॉवर पॉइंटचा वापर करुन प्रेंझेटेशन कसे करावे, एक्सल शीट कशी तयार करावी याचे मार्गदर्शन केले.
यावेळी गोगटे जोगळेकर कॉलेजच्या गणित विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे , जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था रत्नागिरी सीनियर लेक्चरर क्लास वन ऑफिसर अनुपमा तावशीकर, महर्षी कर्वे संस्थेचे प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई, प्रकल्प समन्वयक स्वप्निल सावंत, महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा कोतवडेकर उपस्थित होत्या. यावेळी अनुपमा तावशीकर, डॉ. राजीव सत्रे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. केतन पाथरे यांनी तर आभार प्रा. श्रुती यादव यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Putin Visit to India: भारत-अमेरिका 'ट्रेड वॉर' सुरू असताना, चार वर्षानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन येताय दिल्लीत!

Sanju Samson : मोठी बातमी! संजू सॅमसन CSK त जाण्याच्या तयारीत...संघ व्यवस्थापनाकडे केली 'ही' मागणी; राजस्थानच्या रॉयल्सच्या गोटात नेमकं काय शिजतंय?

Viral Video: सोंडेत धरला ब्रश अन् हत्तीनेच काढलं हत्तीचं चित्र; जराही रेष इकडे-तिकडे नाही, सोशल मीडियात हुशार हत्तीचं होतंय कौतुक

Deepak Pawar: मराठी माणूस मुस्लिमांचा अकारण राग करतो, पण जैन लोकांची मुजोरी...; दीपक पवारांचं सूचक वक्तव्य, काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates: विक्रोळी नगरात एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर त्याच्याच बाजूला निष्ठावंत आमदार सुनील राऊत असे बॅनर

SCROLL FOR NEXT