कोकण

सहकारी पतसंस्था कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

61831

सहकारी पतसंस्था कार्यशाळेस
सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी, ता. ५ ः जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग व कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षनिमित्त येथील नवसरणी केंद्रामध्ये जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
व्यासपीठावर प्रख्यात योग प्रशिक्षक अशोक देशमुख, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, सहाय्यक उपनिबंधक कृष्णकांत धुळप कणकवली, सुजय कदम सावंतवाडी, सुनील मर्बलकर कुडाळ, श्रीकृष्ण मयेकर जिल्हा उपनिबंधक कार्यालय सिंधुदुर्ग, कॅथॉलिक पतसंस्थेच्या चेअरमन आनमारी डिसोजा, व्हॉईस चेअरमन पीटर दिया, सेक्रेटरी मार्टिन आल्मेडा, संचालक ऑगस्तीन फर्नांडिस, जॉनी फेराव, जॉय डॉन्टस, मार्सेलीन डिसोजा, व्हिक्टर पिंटो, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबूराव कविटकर, सुनील राऊळ कार्याध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत ‘ताणतणावाचे व्यवस्थापन’ विषयावर प्रख्यात योग प्रशिक्षक अशोक देशमुख यांचे व्याख्यान झाले. ‘सीआरएआर ः पतसंस्थांच्या आर्थिक आरोग्याचा आरसा’ या विषयावर ॲड. दीपक पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी स्वतः तयार केलेल्या ‘सहकार सोपान’ क्यूआर कोड ग्रंथालयाचे अनावरण करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्ष आनमारी डिसोजा यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. ‘कॅथॉलिक पतसंस्थेची यशोगाथा’ ही माहिती चित्रफीत स्वरुपात सादर करण्यात आली. भारतीय संविधान उद्देशिका प्रतीचे वितरण केले. महेश कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. कॅथोलिक पतसंस्थेचे सरव्यवस्थापक जेम्स बोर्जीस यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beating Video : असला वंशाचा दिवा कशाला? मुलाकडून वृद्ध वडिलांना अमानुष मारहाण, नागपूरमधील संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Mukesh Khanna: लेखकांना सलमानपेक्षा जास्त मानधन मिळालं तरच चांगले सिनेमे घडतील; मुकेश खन्नांचा सलमान खानवर अप्रत्यक्ष निशाणा

Latest Maharashtra News Updates Live: ''खालिद का शिवाजी' चित्रपटावर बंदीसाठी शिवप्रेमी संघटना आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

Gold Rate Today : दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या भावात घसरण, चांदी उतरली, खरेदीची हीच योग्य वेळ?

Asit Modi And Disha Vakani: असित मोदी व दिशा वकानी यांचे रक्षाबंधन सेलिब्रेशन चर्चेत; मालिकेबाहेरील नात्याची घट्ट जुळणी अधोरेखित

SCROLL FOR NEXT