६२३३९
वेंगुर्लेत भाजप कार्यकर्त्यांकडून
‘ऑपरेशन सिंदूर’चा विजयोत्सव
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ७ ः भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ''ऑपरेशन सिंदूर'' ही मोहीम फत्ते केली. या विजयाबाबत येथील भाजप कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला.
भारतीय हवाई दलाने मंगळवारी (ता. ६) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री १.२८ वाजता ही कारवाई सुरू होऊन १.५१ वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झाली. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ''ऑपरेशन सिंदूर'' असे नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेने पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केले. या यशस्वी मोहिमेचा आज भाजपकडून येथील तालुका कार्यालय येथे तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष विष्णू ऊर्फ पप्पू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल, मनवेल फर्नांडिस, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, मनोहर तांडेल, प्रीतम सावंत, वैभव होडावडेकर, हसीनबेगम मकानदार, दादा केळूसकर, सायमन आल्मेडा, शीतल आंगचेकर, सुभाष खानोलकर, सुनील घाग, कार्तिकी पवार, स्वरा देसाई, गणेश गावडे, पुंडलिक हळदणकर, कृष्णा हळदणकर, सत्यवान पालव, राहुल मोर्डेकर, तेजस कुंभार, रवींद्र शिरसाट, नामदेव सरमळकर, सत्यविजय गावडे, राजबा सावंत, कृष्णाजी सावंत, अजित कनयाळकर, आदित्य मांजरेकर, रफीक शेख, नितीन लिंगोजी, अक्षय परब, महेश प्रभुखानोलकर, रामचंद्र गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.