कोकण

ःरत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्यांना कुलूप

CD

रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्यांना कुलूप
स्थानिक पोलिसांचा बदलीला नकार ; नियुक्त्या रखडल्या
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ः कोकणरेल्वे मार्गावरील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कोकण रेल्वेच्या सुरक्षिततेची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर देण्यात आली. रोहा, रत्नागिरी, कणकवली येथे पोलिस ठाणे उभारुन त्या माध्यमातून चोरीसह अन्य गुन्हे उघड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या-त्या जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले जाणार होते, परंतु लोहमार्ग पोलिस दलात जाण्यासाठी स्थानिक पोलिस कर्मचारी इच्छुक नसल्याने कर्माचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडली असून तिन्ही रेल्वे स्थानकातील तात्पुरत्या पोलिस स्थानांना कुलूप ठोकण्यात आले आहे.
शासनाने या पोलिस स्थानकांचा प्रारंभ केला. प्रत्यक्षात पोलिस ठाणे केव्हा सुरु होणार असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीतील स्थानके, प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर आहे. रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अखत्यारीत आहे. सध्या लोहमार्ग पोलिसांची हद्द सीएसएमटी ते पनवेल आणि कर्जत, खोपोली, मंकीहिल स्टेशनपर्यंत आहे. रोह्यापासून पुढे कोकण रेल्वे हद्द सुरु होते. या हद्दीतील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर आहे. मात्र गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिसांना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने रोहा, रत्नागिरी, कणकवली येथे लोहमार्ग पोलिस स्थानकांची उभारणी केली आहे. त्याचा प्रारंभ करण्यात आला मात्र प्रत्यक्षात पोलिस ठाण्यांचे कामकाज सुरू झालेले नाही.
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाडीत कोकण रेल्वेस्थानकांदरम्यान एखादा गुन्हा घडल्यानंतरही त्याबाबची तक्रार प्रवासी मुंबईत आल्यानंतर करतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्याचे काम लोहमार्ग पोलिसांना करावे लागते. कोकण रेल्वेच्या हद्दीतून प्रवास करताना लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर माहिलांची छेडछाड, विनयभंग किंवा अन्य मारहाणीच्या तक्रारी येतात. मात्रा या हद्दीत लोहमार्ग पोलिस नसल्याने रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधून कारवाई करावी लागत होती. आपल्या हद्दीतील स्थानके, तसेच प्रवाशांची सुरक्षा व घडणाऱ्या गुन्ह्याचा तपास करता यावा यासाठी कोकण रेल्वेवरील तीन स्थानकांमध्ये पोलिस ठाणे स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. रत्नागिरी आणि कणकवली येथे महत्वाची तीन पोलिस ठाणे स्थापन करण्यात आली. या पोलिस ठाण्याच्या अखत्यारित अन्य स्थानकांचा समावेश करण्यात येईल. त्यासाठी वरिष्ठ दर्जाचे अधिकारी तसेच कर्माचारी आदी मनुष्यवबळही उपलब्ध करण्याची तयारी सुरु असताना स्थानिक पोलिसांना लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करुन त्यांच्यामाध्यमातून ही पोलिस स्थानके चालविण्यात येणार होती मात्र स्थानिक पोलिस अधिकारी, कर्मचारी लोहमार्ग पोलिसांकडे जाण्यास तयार नसल्याने अधिकारी, कर्माचाऱ्याच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.
---
अपुरे कर्मचारी
कोकण रेल्वे स्थानक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ३१ अधिकारी, ८७८ अमंलदाराची आवश्यकता आहे. मात्र सध्या लोहमार्ग पोलिसांकडे पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला स्वत:चाच विक्रम; स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केले तब्बल १०३ मिनिटे भाषण

Latest Marathi News Live Updates : जयकुमार गोरे यांच्या हस्तेजिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला ध्वजारोहन सोहळा

Janmashtami Decoration Ideas: जन्माष्टमी निमित्त मंदिर सजवायचंय? या सोप्या आणि सुंदर आयडिया नक्की ट्राय करा!

President Droupadi Murmu : संकटांचा सामना करण्यास सैन्य सक्षम; राष्ट्रपतींकडून संरक्षण दलांवर विश्‍वास व्यक्त अर्थव्यवस्थेचेही कौतुक

Independence Day 2025 : महाराष्ट्र कारागृह विभागातील आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक

SCROLL FOR NEXT