कोकण

डिगसमध्ये १० पासून विविध कार्यक्रम

CD

डिगसमध्ये १० पासून
विविध कार्यक्रम
कुडाळ ः डिगसची ग्रामदेवता कालिका देवीचा प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १० ते १२ मे दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १० ला सकाळी ७ वाजता देवीची विधीवत पूजा, ८ वाजता देवीची पालखी व तरंग सजविणे, ९ वाजता देव लिंग, काळंबा (कालिका) देवी पंचायतन अभिषेक, दुपारी ३ वाजता स्थानिक भजने, ५ वाजता हरिपाठ, सायंकाळी ६ वाजता प्रशांत धोड यांचे कीर्तन, रात्री ८ वाजता लहान मुलांचे व महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, १० वाजता जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धा (लहान व मोठा गट) ११ मे सकाळी ७ वा विधीवत पूजा, ८ वाजता होमहवन, १२ वाजता आरती, १ वाजता महासाद, ३ वाजता स्थानिक भजने, ५ वाजता हरिपाठ, रात्री ८ वाजता जिल्हास्तरीय गायन स्पर्धा (भावगीत व भक्तिगीत), १२ ला सकाळी ८ वाजता विधीवत पाद्यपूजा व अभिषेक, ९ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, १ ते ३ महाप्रसाद, २ वाजता श्री कला सानिध्य प्रस्तूत सुमधुर गीतांचा कार्यक्रम स्वरांजली व हिंदू सनातन संस्था प्रवचन, सायंकाळी ५ वाजता हरिपाठ, ७ वाजता संदेश कसवले यांचे भजन, रात्री ८ वाजता काळंबा देवी मंडळाचे समईनृत्य, ९ वाजता दिंडी भजन (चुनवरे), ११ वाजता पालखी सोहळा १२ वाजता ग्रामदेवता दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समिती, गावकर व डिगस ग्रामस्थांनी केले आहे.
--
मसुरे जैन भरतेश्वरचा
१३ ला वर्धापन दिन
मसुरे ः मसुरे-देऊळवाडा येथील देव जैन मरतेश्वर मंदिराचा वर्धापन दिन सोहळा १३ ला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता गणेश पूजन, ८.४५ वाजता महाअभिषेक व हवनविधी, दुपारी १ वाजता महाआरती, १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता महाआरती, ७.३० वाजता भजने, रात्री ८.३० वाजता शाही पालखी सोहळा, ८.५० वाजता देऊळवाडा महिला मंडळ दिंडी नृत्य, रात्री १०.३० वाजता संगीत सामाजिक नाट्य कलाकृती ''न्यायाचा तराजू'' सादर होणार आहे लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
--------------
पोईपमध्ये १० पासून
क्रिकेट स्पर्धा
मालवण ः तरुण सहकार मंडळ येरम म्हसकर आयोजित वार्षिक क्रिकेट स्पर्धा १० ते १२ मे या कालावधीत पोईप धरण मैदानावर आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १२,००१ रुपये व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक ८००१ रुपये व आकर्षक चषक तसेच प्रत्येक सामन्यातील सामनावीरास आकर्षक टी-शर्ट व कैप तसेच इतर वैयक्तिक आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम येणाऱ्या १६ संघांनाच सहभाग देण्यात येईल. स्पर्धेसाठी ओकार येरम, सदाशिव येरम, सचिन पालव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
---------------
वेरलीत १० पासून
क्रिकेट स्पर्धा
मालवण ः वेरली येथे डब्ल्यू सी. सी. क्रिकेट क्लब आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा १० व ११ ला विठ्ठलवाडी मैदान, वेरली-मुणगेकरवाडी, धुरी हॉल जवळ होणार आहे. ही स्पर्धा ‘एक गाव एक ग्रामपंचायत’ अशी आहे. प्रथम क्रमांकास १५,००१ व चषक, तर द्वितीय १०,००० व चषक तसेच मालिकावीरला बॅट व पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी अविनाश मुणगेकर, प्रथमेश कवठणकर, तेजस भोगले, अमित भोगले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : आईचे अनैतिक संबंध, अल्पवयीन मुलाने तिच्या प्रियकराला संपवलं; कोयत्यानं सपासप वार, हत्येनंतर स्वत:च पोलिसांकडे गेला

सोलापुरात एसीचा भीषण स्फोट; विवाहित महिलेचा होरपळून मृत्यू, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पण...

मुंबईत मुसळधार, विक्रोळीत दरड कोसळून बापलेकीचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी

Mumbai Local Train : मुंबईत मुसळधार! मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल रखडल्या; प्रवाशांची पायपीट, उशिराने धावताहेत गाड्या

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबईसह मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; IMD चा अलर्ट

SCROLL FOR NEXT