दहशतवादी प्रवृत्तीला धडा शिकवला पाहिजे
भागीरथबाई ढगळे ः शहीद सुभेदारांच्या आईची प्रतिक्रीया
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः देशातील असो किंवा कुटुंबातील वाद असो तो युद्धाने संपत नाही. उलट तो अधिक तीव्र होतो. अशावेळी चर्चेतून मार्ग निघू शकतो. परंतु, दहशतवाद्यांमुळे आताची जगभरातील परिस्थिती पूर्णतः बदलली असून, अशा प्रवृत्तीला धडा शिकवलाच पाहिजे, अशी भावना चिपळूणचे शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्या आई भागीरथबाई शांताराम ढगळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.
चिपळूण तालुक्यातील मोरवणेचे सुपुत्र अजय ढगळे सुभेदार म्हणून सैन्यात होते. दोन वर्षापूर्वी भारत-चीन सीमेवर आसाममधील तैवान येथे रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या रेकी करण्याचे काम ढगळे व त्यांच्या सहकाऱ्यांकडे होते. त्या कर्तव्यावर असतानाच भूस्खलन होऊन ढगळे यांना २६ मार्च २०२३ ला वीरमरण आले. भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली असते त्या म्हणाल्या, दहशतवादाचा बिमोड केला पाहिजे. सरकारने त्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. शहीद अजय यांच्या आठवणीत आई भागीरथबाई ढगळे आजही सहजासहजी गाव सोडायला तयार नाहीत. त्यांचे कुटुंबीय सध्या पुणे येथे वास्तव्यास असताना त्या मात्र आपल्या वीरपुत्राच्या एकेका आठवणीला उजाळा देत गावीच थांबल्या आहेत. कोणतीही आई आपल्या दुःखाचे प्रदर्शन करत नाही. आज देशासाठी अजय वीरपुत्र, शहीद जवान असला तरी तो माझ्यासाठी मुलगाच होता. त्याच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान ठेवून पंचक्रोशीतील काही तरुण सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित होतात, हेच मातृत्वाला मिळालेले मोठे बक्षीस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.