
Sanjay Raut on Uddhav Thackeray and Raj Thackeray Form Alliance: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकारे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये मीडियाशी बोलताना मोठी घोषणा केली. संजय राऊत म्हणाले, ’’मुंबई महापालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत. नाशिकमध्ये, ठाण्यात, कल्याण-डोंबिवलीत आम्ही एकत्र लढू. मुंबईसह अशा अनेक महापालिका आहेत, जिथे आम्ही एकत्र लढण्यासाठी आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे.’’
तसेच ‘’उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आहे आणि ती राहणार. आता कोणतीही अघोरी शक्ती आली तरीही ही मराठी माणसाची वज्रमूठ तोडू शकत नाही. नाशिकमधील मोर्चालाही दोन्ही पक्षाचे शहर आणि जिल्ह्यातील नेते एकत्र असतील.’’ अशीही माहिती संजय राऊतांनी यावेळी दिली.
तर ‘’मागील दहा वर्षांपासून दिल्लीकडून महाराष्ट्र कमजोर व्हावा असे प्रयत्न सुरू आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती मराठी माणसाला, महाराष्ट्राला नामर्दे करण्याचा कसोशीने प्रय़त्न करत आहेत. त्यांना वाटतं की मराठी माणसाने लढण्यासाठी उठू नये. पण मराठी माणूस स्वाभिमानी आहे, आम्हाला माहीत आहे काय खायचं, काय प्यायचं आणि कधी तलवार उपसायची. ही तलवार आता दोन ठाकरे बंधूंनी उपसली आहे.’’ असं राऊत म्हणाले.
याचबरोबर ‘’धार्मिक राज्य होतं, धार्मिक देश होता यांनी धर्मांध केला. त्यांनी तालिबानी प्रवृत्तीचा धर्म इथे आचरणात आणण्यासाठी बंधन लादली. आजही या देशात बेरोजगारी, भूक, कायदा-सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा याची गंभीर सुरक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ७५ वर्षांचे होतील आणि देशाचं स्वातंत्र्या ७९ वर्षांचं झालं. या ७९ वर्षांत देश नक्कीच प्रगतीपथावर गेलाय. याचं श्रेय या देशाचं नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना जातं. काही लोकांना वाटतं की, २०१४मध्ये देश स्वतंत्र झाला. पण खऱंतर २०१४नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला.’’ अशा शब्दांत राऊतांनी मोदी सरकारवर टीकाही यावेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.