कोकण

संगमेश्वर ः संगमेश्वर तालुका लीग स्पर्धेत स्वराज्य रक्षक विजयी

CD

rat12p23.jpg
63277
संगमेश्वरः तालुका कबड्डी लीग स्पर्धेतील विजयी स्वराज्यरक्षक संघाचा सन्मान करण्यात आला.

कबड्डीत ‘स्वराज्यरक्षक’ संघ विजयी
तालुकास्तरीय लीग स्पर्धा; माऊली, प्रियल स्पोर्ट्स क्लबचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १४ ः संगमेश्वर येथील माभळे काष्टेवाडी येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कबड्डी लीग स्पर्धेत स्वराज्यरक्षक संघ विजयी झाला असून, छावा सह्याद्री संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
माऊली स्पोर्ट्स क्लब आणि प्रियल स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने ही स्पर्धा आयोजित केली होती. क्लबच्यावतीने दरवर्षी ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षीही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. लीग स्पर्धेत तालुक्यातील गुणवंत खेळाडू सहभागी झाले होते. सलग दोन दिवस आयोजित स्पर्धेचा पारितोषिक वितरण प्रो कबड्डी स्टार सिद्धेश तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला आहे.
लीग स्पर्धेत स्वराज्यरक्षक या संघाला विजेतेपद मिळाले असून, रोख रक्कम १५ हजार रुपये आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले तर द्वितीय क्रमांक मिळालेल्या छावा सह्याद्री संघाला १० हजार रुपये रोख आणि चषक देऊन गौरवण्यात आले. तिसरा क्रमांक हिंदवी योद्धाला मिळाला असून, त्यांना ५ हजार रुपये आणि चषक देण्यात आला. चौथा क्रमांक शिवप्रताप संघाला मिळाला असून, ५ हजार रुपये रोख आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच उत्कृष्ट चढाई आशिष बडद, उत्कृष्ट पकड प्रणव गेल्ये, सेमी फायनल उत्कृष्ट चढाई सोहम भोसले, पब्लिक हिरो सुयोग काष्टये, उगवता तारा दिप्तेश जोशी, मालिकावीर राजेश चव्हाण याला देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसांसहित सायकल, कूलर, स्मार्टवॉच, स्पोर्टशूज आदी विविध आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT