पिंगुळीत आज
सत्संग सोहळा
ओटवणेः श्री काडसिध्देश्वर भक्त मंडळ काळेपाणी पिंगुळी, गवळदेव मित्रमंडळ पिंगुळी आणि श्री क्षेत्र सिध्दीगिरी संस्थान कणेरी मठाचे मठाधिपती सदगुरू अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत उद्या (ता. १५) सत्संग सोहळा आयोजित केला आहे. श्री काडसिध्देश्वर अध्यात्म केंद्र पिंगुळी काळेपाणी (ता. कुडाळ) येथे आयोजित केलेल्या या सोहळ्यात सकाळी ५ वाजता काकड आरती, ७ ते ९.३० भजन, १० वाजता महाराजांचे अमृतवाणीतून प्रवचन, दुपारी १ वाजता आरती, दर्शन, महाप्रसाद असा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पिंगुळी भक्त मंडळ तसेच सदगुरू अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी महाराज सेवेकरी यांनी केले आहे.
.................
नाट्य महोत्सवाचे
देवगडात आयोजन
देवगड : येथील युथ फोरम आयोजित व पालकमंत्री नीतेश राणे यांच्या सहकार्यातून शनिवारी (ता. १७) व रविवारी (ता.१८) सायंकाळी ७ वाजता येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या पटांगणावर नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्य महोत्सवांतर्गत सहा एकांकिका प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये रत्नागिरी, चिपळूण, कुडाळ तसेच देवगडमधील नाट्य कलाकृतींचा समावेश आहे. कलाकार, नाटक आणि रसिक प्रेक्षकांना एकत्र आणून देवगडमधील नाट्य चळवळीला उर्जितावस्था देण्यासाठी हा उपक्रम आहे. शनिवारी (ता.१७) सायंकाळी ७ वाजता शेठ म. ग. हायस्कूल निर्मित ''हमावणी'' (लेखिका, दिग्दर्शिका आज्ञा कोयंडे), रात्री ८ वाजता-नाट्यशोध रत्नागिरी निर्मित ''कुपान'' (लेखक -कृष्णा वाळके, दिग्दर्शक-गणेश राऊत), ९ वाजता ''ढ'' मंडळी, कुडाळ निर्मित ''वाल्मिकी'' (लेखक-दिग्दर्शक तेजस मसके), रविवारी (ता.१८) सायंकाळी ७ वाजता डी. बी. जे. हाउसफुल्ल नाट्यसंस्था चिपळूण निर्मित ''लेटर बॉक्स १४३'' (लेखक-यश नवले, दिग्दर्शक भावेश कुंतला, नितीन सावले), रात्री ८ वाजता अॅक्टीस क्रिएटर्स, देवगड निर्मित ''वन पीस'' (लेखक-मयुर साळवी, दिग्दर्शक-आकाश सकपाळ), ९ वाजता श्री समर्थ कलाविष्कार, देवगड निर्मित ''मशाल'' (लेखक अनिरुद्ध नारिंग्रेकर, दिग्दर्शक विजय कदम).
....................
पाणवठे पुनर्जीवित
करण्याची मागणी
सावंतवाडीः वन्यजीव संरक्षणाकरिता वन विभागाने तत्परतेने माजगावातील वन्यक्षेत्रातील पाणवठे पुनर्जीवित करावेत. वनक्षेत्रात बीजारोपण करून संगोपन करावे. जेणेकरून वन्यप्राणी मानव वस्तीत येऊन शेतकर्यांच्या शेती, बागायती पिकांचे नुकसान करणार नाही, याची दक्षता वन विभागाने तत्परतेने घेऊन अंमलबजावणी करावी. केवळ वृक्षतोड परवानगी हे एकमेव वन विभागाचे कर्तव्य नाही. याची जाणीव उपवनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी यांनी ठेवायला हवी, अशी मागणी बाळू निचम यांनी कोल्हापूर वन विभागाकडे केली आहे.
......................
रेवतळेत १९ पासून
महालक्ष्मीचा गोंधळ
मालवणः रेवतळे येथील महापुरुष देवघर येथे १९ ते २२ मे या कालावधीत महालक्ष्मी देवीचा गोंधळ उत्सव, वार्षिक कुलस्थापना दिन व इतर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त मांजरेकर बंधू व मित्रपरिवाराने केले आहे.
........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.