swt157.jpg
63945
आंबोलीः स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आलेले १९९१ च्या बॅचचे माजी विद्यार्थी.
युनियन स्कूलच्या वर्गमित्रांचा
आंबोलीत रंगला स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. १५ : गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी, असे म्हटले तरी शाळा, शाळेतील दिवस, सोबती, मित्र, शिक्षक आणि त्यांचा गोड सहवास शाळा सोडून गेल्यानंतरही स्मरणात राहतात. अशाच आठवणींमधून पुन्हा एकदा आंबोली युनियन स्कूलचे १९९१ च्या दहावी बॅचचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन गेट-टुगेदर साजरा केला. ग्रीन व्हॅली हॉटेल येथे हा स्नेहमेळावा पार पडला.
त्या काळातील विद्यार्थी जीवन, परिस्थिती आणि शिक्षण, भरपूर पाऊस, शेकोटी, थंडी, पावसाळ्यातील दिवस, शिक्षकांची भीती, डी. पी. सावंत यांच्यासारखे सौम्य आणि मितभाषी चित्रकला शिक्षक, मुलांना न मारता शिकविणारे एस. व्ही. पाटील, प्रयोगशाळेत वेगवेगळे रासायनिक प्रयोग दाखवणारे चौगुले सर, मराठी शिकवणाऱ्या परब मॅडम, श्री. जगताप या सेवानिवृत्त शिक्षक तसेच विद्यमान केंद्रप्रमुख आर. बी. गावडे यांच्यासमवेत विद्यार्थी गुणाजी गावडे, हेमंत ओगले, लक्ष्मण गावडे, दीपक गावडे, मोतिराम सावंत, मंगेश गुरव, भरमू पाटील, नंदा गावडे यांची कुटुंबे एकत्र येत आठवणींना उजाळा दिला.
शिक्षकीपेक्षा आणि विद्यार्थी पुढे आपल्या आपल्या क्षेत्रात जीवनक्रम जगत असतानाच्या गप्पागोष्टी करत कार्यक्रम साजरा केला. हा स्नेहबंधाचा कार्यक्रम यादगार ठरला. स्वागत गुणाजी गावडे यांनी, सूत्रसंचालन लक्ष्मण गावडे यांनी केले. आभार हेमंत ओगले यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.