-rat१५p२२.jpg-
२५N६३९३८
रत्नागिरी : पत्रकार परिषदेत बोलताना हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश भोगले. सोबत आनंद कुलकर्णी, दत्ता सणस आणि महेश सावंतपटेल.
----
पाकव्याप्त काश्मीर घेण्याची हीच योग्य वेळ
दिनेश भोगले ः हिंदू महासभेने नोंदवला निषेध
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : भाजपवाले तथाकथित हिंदुत्ववादी असून, त्यांनी समाजवादी धोरण स्वीकारले आहे. काँग्रेस भाजप एकाच नाण्याच्या बाजू आहेत. भारत-पाक युद्धाच्या वेळेस अमेरिकेच्या सांगण्यावरून माघार घेणे अत्यंत चुकीचे आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेण्याची ही योग्य वेळ आहे; परंतु ती भाजप सरकारने गमावली आहे, असे स्पष्ट मत अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश भोगले यांनी व्यक्त केले. आज गुरूकृपा मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली रोखठोक मते मांडली.
पहलगाम हल्ला व त्यानंतर भारताने केलेल्या प्रतिहल्ल्याबाबत भोगले म्हणाले की, सैन्यदलाने अपार शौर्य दाखवले व पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तानात हल्ला करून यश मिळवले; पण केंद्र सरकारने माघार घेतल्यामुळे आम्ही त्यांचा निषेध नोंदवत आहोत. अमेरिकेच्या इशाऱ्यावर भारताने युद्ध थांबवले, ही मोठी चूक आहे. इतिहासातून आपण काहीही शिकलो नाही. युद्धात मिळवले तर तहात घालवले, अशी स्थिती भारताची झाली आहे. समस्त भारतवासियांना युद्धातून पाकव्याप्त काश्मीरचा ताबा हवा होता; परंतु ती संधी सरकारने गमावली आहे. पाकिस्तान हा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा देश नाही, असे भोगले यांनी नमूद केले.
महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद कुलकर्णी म्हणाले की, पूर्वीच्या युद्धात जर नेहरूंनी युद्धबंदी जाहीर केली नसती तर संपूर्ण काश्मीर आपले असते आणि काश्मीरची समस्या उद्भवली नसती. या युद्धबंदीने मोदींनी जनभावनेचा विश्वासघात केला आहे आणि भारतीय सैन्याची प्रतिमा खराब केली आहे. पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याची संधी गमावून, राष्ट्रीय हिताचे मोठे नुकसान झाले आहे. युद्धबंदीनंतरही पाकिस्तान हल्ला करत राहील आणि फक्त तीन तासांत हे सिद्ध झाले आहे.
-----
युद्ध किंवा बुद्ध निवडा
जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर मुक्त होत नाही तोपर्यंत युद्धकैद्यांचा प्रश्नच उद्भवणार नाही. युक्रेन-रशियाच्या युद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांततेचे आवाहन केले; परंतु भारत-पाक युद्धात शांतता चालणार नाही. शांतीमंत्राचा जप करून देशाच्या सीमा सुरक्षित राहू शकत नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांनी आता ‘युद्ध किंवा बुद्ध’ निवडण्याची वेळ आली आहे. सरकारने लष्कराला मोकळीक द्यावी आणि पाकिस्तानात प्रवेश करण्याचे आदेश द्यावेत, असेही या वेळी हिंदू महासभेतर्फे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.