
भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंनी “ट्रिस्ट विथ डेस्टिनी” भाषण केले होते.
तसेच राधाकृष्णन यांच्या भाषणातील एकता आणि प्रगतीचे विचार आजही भारतीयांना प्रेरणा देतात.
या भाषणाचा व्हिडिओ आज व्हायरल होत आहे
आज15 ऑगस्ट 2025 रोजी भारत 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करत आहे. 1947 मध्ये ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झालेला हा देश आजही स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देतो. त्या ऐतिहासिक 14 ऑगस्टच्या मध्यरात्री संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी "ट्रिस्ट विथ डेस्टिनी" हे अजरामर भाषण केले. हे भाषण केवळ शब्दांचा खेळ नव्हते तर स्वप्न आणि संकल्पांचा अखंड नाद होता. त्यांनी भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दिशा दाखवली.
या प्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीही आपले विचार मांडले. नेहरूंच्या विनंतीवरून केलेल्या त्यांच्या भाषणातील मुद्दे आजही प्रासंगिक आहेत. लाल किल्ल्यावरून नेहरूंच्या भाषणाने स्वातंत्र्याच्या लढ्याला सलाम केला, तर राधाकृष्णन यांनी एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. हा स्वातंत्र्यदिन आपल्याला प्रदीर्घ संघर्षाची आठवण करून देतो आणि नवभारताच्या निर्मितीसाठी प्रेरित करतो. त्यांच्या भाषणाचा संक्षिप्त भावानुवाद येथे देत आहोत.