सावंतवाडीत उद्या
काव्यसंग्रह प्रकाशन
सावंतवाडी ः सिंधुदुर्गातील नाट्यकर्मी आणि कवयित्री कल्पना बांदेकर यांच्या ‘जपलाला कनवटीचा’ या मालवणी बोलीभाषेतील काव्यसंग्रहाचे रविवारी (ता.१८) येथील श्रीराम वाचन मंदिरात सायंकाळी ५ वाजता प्रकाशन होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे असतील. तर साहित्य अकादमीप्राप्त साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, कवी अजय कांडर प्रमुख पाहुणे असतील. कवयित्री डॉ. शरयू आसोलकर व समीक्षक प्रा. डॉ. गोविंद काजरेकर यावेळी भाष्य करतील. श्रीराम वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर व समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर प्रमुख निमंत्रित असतील. काव्यसंग्रहास साहित्यिक डॉ. महेश केळुसकर यांनी मालवणीत प्रस्तावना लिहिली आहे. या काव्यसंग्रहातून मालवणी माणसाचे जगणे, बोलणे, चालण्या-वागण्याची पद्धत, श्रद्धा-अंधश्रद्धा, येथील निसर्ग काव्यबद्ध केला आहे.
---
कणकवलीत उद्या
‘वास्तू सल्ला’
कणकवली ः गुरुस्पर्श ज्योतिष विद्यालय यांच्यामार्फत रविवारी (ता.१८) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नाथपंथीय मार्गदर्शन व ज्योतिष वास्तू सल्ला कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात होणार आहे. या अंतर्गत नाथपंथीय पद्धतीने गूढ व ऊर्जात्मक मार्गदर्शन, ज्योतिष व वास्तू विश्लेषण, दिशात्मक दोष, दुरुस्ती व उपाय, विशेष उपचार, ऊर्जा संतुलन तंत्र, वास्तू बांधणे, दिव्य महासिद्धी वनस्पती व रुद्राक्ष याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी गूढ विज्ञान संशोधक ज्योतिषी रुद्रांग त्रिवेणी बाळ गोसावी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
----------------
ट्रिपल सीट स्वारावर
सावंतवाडीत गुन्हा
सावंतवाडी ः येथील पोलिसांनी गुरुवारी (ता.१५) चिटणीस नाका ते तीनमुशी नाका परिसरात ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या एकावर गुन्हा दाखल केला. राजेंद्र रामकिशन पाल (वय ३२, रा. आढाववाडी वाफोली बांदा) असे त्याचे नाव आहे. दुपारी बाराच्या सुमारास राजेंद्र पाल हा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, रहदारीच्या रस्त्यावर निष्काळजीपणे आणि वेगात ट्रिपल सीट चालवताना सापडला. हेड कॉन्स्टेबल सुनील नाईक यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यानुसार येथील पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.