कोकण

बचत गटांच्या उत्पादनांना हवी मोठी बाजारपेठ

CD

- rat१७p४.jpg, rat१७p५.jpg-
२५N६४३९९, २५N६४४००
गणपतीपुळे ः येथील सरस प्रदर्शनातील बचत गटाला मान्यवरांसह, ग्राहकांनी भेट दिली.

बचत गटांच्या उत्पादनांना हवी बाजारपेठ
उत्पादन विक्रीत अडचणी ; जिल्ह्यात १५ हजार इतकी संख्या, ‘उमेद’मधून रोजगार संधी
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १७ ः महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) ग्रामीण भागात यशस्वी होत आहे. स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. परंतु गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना गावात बाजारपेठ नसल्यामुळे उत्पादन विक्रीत अडचणी येत आहेत. त्यासाठी परजिल्ह्यातील बाजारपेठांची संलग्नता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर काम करणे अपेक्षित आहे.
ग्रामीण जीवनोन्नती अभियानामुळे ग्रामीण भागातील महिला आता कर्त्या पुरुषाच्या बरोबरीने रोजगारात एक पाऊल पुढे टाकत आहेत. स्वतःचा व्यवसाय सुरू करत कुटुंबाच्या अर्थकारणासाठी रोजगाराच्या वाटा शोधत आहेत. उमेदमुळे हा अमुलाग्र बदल ग्रामीण भागात पाहायला मिळतो. ग्रामसंघ आणि प्रभागसंघ यांसारख्या स्थानिक संस्था उमेद अंतर्गत निर्माण झाल्या आहेत. उमेद अभियानांतर्गत महिलांना स्वयंसहाय्यता गटांमध्ये संघटित केले जाते. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे १५ हजार स्वयंसहाय्यता बचत गट सद्या कार्यरत आहेत. बचत समूहांच्या माध्यामतून महिलांनी विविध व्यवसाय उभे केले आहेत. जसे की, शेती, शेतीपूरक व्यवसाय, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, हस्तकला, पापड, लोणचे आदी व्यवसायांमध्ये आघाडी घेतली आहे. बचत समूहांनी उत्पादित केलेल्या उत्पादन विक्रीसाठी उमेद अंतर्गत जिल्ह्यात रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे ‘सरस’ सारखे अल्पावधीत लोकप्रिय झालेले प्रदर्शन भरवले जाते. या प्रदर्शनाला गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांनी अधिक पसंती दर्शवली आहे. यावर्षीपासून दापोली शहरात ‘सरस’ प्रदर्शन भरवून उत्तर रत्नागिरीतील स्वयंसहाय्यता समूहांसाठी उत्पादन विक्रीचे नवे दालन सुरू करण्यात आले आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना येथील नैसर्गिक सौंदर्यांबरोबर कोकणातील खानपान, राहणीमान याचबरोबर सांस्कृतिक परंपरा याचे आकर्षण असते, त्यामुळे त्यांचा कल बचत समूहांनी उत्पादित केलेल्या उत्पादन खरेदीकडे अधिक असतो. यासाठी विशेष पसंतीस उतरलेले सरससारखी प्रदर्शने वर्षांतून दोनदा आयोजित केली पाहिजेत. तालुकास्तरावर शासनाकडून उत्पादन विक्री केंद्रांची निर्मिती करण्यात यावी यासाठी बचत समूहांच्या महिला आग्रही आहेत. स्वयंसहाय्यता समूहांना आता उत्पादन विक्री करण्यासाठी हक्काची बाजारपेठ हवी आहे. बचत गटांद्वारे महिलांनी सुरू केलेले छोटे-मोठे व्यवसाय स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देतात. या माध्यमातून महिला संघटीतही झाल्या आहेत. त्यांना तंत्रकुशल बनवून त्यांच्या रोजगार क्षमतेचा वापर करुन घेण्यासाठी शासनाने धोरण निश्चीत केले आहे. त्याअनुषंगाने प्रशिक्षणाबरोबरच बाजारपेठेची सलग्नता, अत्याधुनिक यंत्रणांचा मार्केटिंगसाठी उपयोग केला पाहिजे.
---
हे आहेत नाविन्यपूर्ण प्रयोग
रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाकरिता उमेदने हाऊस बोट संकल्पना मांडली. त्याद्वारे पर्यटक जलपर्यटनाचा आनंद घेत आहेत. काही प्रभातसंघांकडे टुरिस्ट बस सुरू केल्या आहेत. अभियानाद्वारे अनेक व्यवसाय क्षेत्रात, गृहउपयोगी वस्तूंच्या उत्पादनातही महिला आघाडी घेत आहेत. उमेदच्या माध्यमातून महिलांमध्ये रोजगाराचा नवीन आशावाद निर्माण झाला आहे. मंडणगड मधील पंदेरी गावातील एका बचत समूहातील प्रत्येक महिलेने एकमेकांच्या सहकार्याने वेगवेगळे व्यवसाय करत रोजगाराच्या वेगळ्या वाटा शोधल्या आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Dev on stray dog protection: भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी आता कपिल देवही मैदानात; अधिकाऱ्यांना केलं 'हे' आवाहन!

Operation Sindoor मधील शूरवीरांचा सन्मान! १६ BSF सैनिकांना शौर्य पुरस्कार, पाहा संपूर्ण यादी अन् 'या' योद्ध्यांचा शौर्यसंग्राम

Virat Kohli - Rohit Sharma यांचं वनडेतील करियरही संपलं म्हणणाऱ्यांना सुरेश रैनाची चपराक; म्हणाला, ते महत्वाचे आहेत कारण...

Imtiaz Jaleel mutton chicken party: स्वातंत्र्यदिनी जलील यांच्या घरी होणार मटण-चिकन पार्टी; आयुक्तांसह थेट मुख्यमंत्र्यांना निमंत्रण!

Latest Marathi News Updates: सिंहगडावरील ध्वजस्तंभाची वन विभागाकडून तातडीने दुरुस्ती

SCROLL FOR NEXT