१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच एचएसआरपी प्लेट वाहनांवर बसवण्याबाबत महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जुन्या वाहनांना उद्या (१५ ऑगस्ट) पर्यंत एचएसआरपी नंबर बसवण्याची मुदत देण्यात आली होती. आता एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.