-rat१७p७.jpg-
२५N६४४०६
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या या नूतन वास्तूचा दुसरा स्लॅब आता लवकरच होणार आहे.
---
नगर वाचनालयाची वास्तू घेतेय आकार
दुसरा स्लॅब लवकरच ; मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : द्विशतकाकडे वाटचाल करणाऱ्या रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयाची नूतन वास्तू आकार घेत आहे. पहिला स्लॅब पूर्ण झाल्यानंतर आता दुसरा स्लॅबही आता लवकरच होणार आहे. ही इमारत लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी आर्थिक मदत द्यावी, असे आवाहन अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय हे १९७ वर्षाचे हे महाराष्ट्रातील सर्वांत जुने वाचनालय आहे. या वाचनालयाकरिता भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भरघोस मदत देऊ केली आहे. तळमजल्यावर प्रशस्त वाचनालय, कार्यालय, पहिल्या मजल्यावर भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह आहे. स्लॅब आणि त्यावरील बांधकाम पूर्ण करण्याच्या दृष्टीने रत्नागिरीकरांनी मदत करावी, असे आवाहन वाचनालयाने केले आहे. १४ जानेवारी २०२७ रोजी द्विशताब्दी वर्षात वाचनालय प्रवेश करणार आहे. या वाचनालयातील ग्रंथसंपदा सव्वा लाखांच्या आसपास आहे. या ग्रंथमंदिरासाठी अद्याप शासनाचे अनुदान विशेष निधी प्राप्त नाही. अथक प्रयत्न करून निधी संकलनाचे काम अॅड. दीपक पटवर्धन करत आहेत.
---
साडेतीन कोटींची गरज ः
इमारतीसाठी साडेतीन कोटींची गरज आहे. वाचनालयाचे स्वतःचे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. वाचकांची मासिक वर्गणी फक्त ५० रुपये आहे. शासनाचे अनुदान पुरेसे नाही. हे अनुदान टप्याटप्यांत मिळते. त्यामुळे व्यवस्थापक मंडळाने प्रयत्न करून निधी उभारून वाचनालयाची व्यवस्था करणे आवश्यक ठरते. गेल्या ३० वर्षात वाचनालय उत्तम स्वरूपात प्रस्थापित करण्यासाठी मोठी निधी उभारणी करता आला. बहुविध कार्यक्रम उपक्रम राबवले. त्याच ऊर्जेने नव्या इमारतीच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहे, असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.