कोकण

त्रैवार्षिक अधिवेशनानिमित्त कणकवलीत कामगारांची रॅली

CD

64613


त्रैवार्षिक अधिवेशनानिमित्त
कणकवलीत कामगारांची रॅली

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १८ : बांधकाम कामगार संघाशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या चौथ्या त्रैवार्षिक अधिवेशनानिमित्त कणकवली शहरातून आज सकाळी रॅली काढण्यात आली. ‘बांधकाम कामगार महासंघाचा विजय असो’, ‘भारतीय मजदूर संघाचा विजय असो’ यांसह अन्य घोषणा देत कामगारांनी कणकवली परिसर दणाणून सोडला.
कामगारांच्या डोक्यावरील भगव्या टोप्या आणि हातात भारतीय मजदूर संघाच्या ध्वजाचे चित्र लक्षवेधी ठरले. या रॅलीत महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. ‘भारत मात की जय’, ‘वंदे मातरम’, ‘देश हित में करेंगे, काम के लेंगे पुरे दाम’, ‘राष्ट्रभक्ती तेरा नाम बीएमएम, देशभक्ती तेरा नाम बीएमएम’, ‘लाल गुलामी छोडकर बोलो वंदे मातरम’, ‘देशभक्त मजदूरों एक हो’, ‘हम भारत की नारी है, फूल नही चिंगारी है’ आदी घोषणाबाजी महिला व पुरुष कामगारांनी केली. या रॅलीत भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. अनिल ढुमणे, संघाचे महामंत्री किरण मिलगीकर, कोकण विभागाचे प्रदेशाध्यक्ष हरी चव्हाण, बांधकाम कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान साटम, भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष सत्यविजय जाधव, ज्येष्ठ कामगार सुधीर ठाकूर, विकास गुरव यांच्यासह कामगार व महिला सहभागी झाल्या. रॅलीचा प्रारंभ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झाला. अप्पासाहेब पटवर्धन चौक ते वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानपर्यंत ही रॅली काढण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Konkan Ro-Ro Ferry: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! १ सप्टेंबरपासून मुंबई ते कोकण रो-रो फेरी सुरू होणार

Pardee Narwal: निवृत्ती घेतलेल्या डुबकी किंगच्या कर्तृत्वाला सलाम; Pro Kabaddi 12 च्या उद्घाटनापूर्वी विशेष सन्मान

Latest Maharashtra News Updates : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी

Crime: पेट्रोलचा कॅन, निळा कपडा अन्...; पाचवीत शिकणाऱ्या मुलीने शाळेच्या शौचालयातच स्वतःला पेटवून घेतले

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पांनी महाभारत लिहीताना महर्षी वेदव्यासांसमोर कोणती अट ठेवली होती?

SCROLL FOR NEXT