कोकण

पाली बस स्थानकाचे सर्वेक्षण मूल्यांकन

CD

rat18p22.jpg-
64661
पाली : बसस्थानकाचे ‘स्वच्छ स्थानक अभियानां’तर्गत सर्वेक्षण करताना रायगडच्या विभागीय वाहतूक अधीक्षक मनीषा पाटील, सुहास कांबळे, भाग्यश्री प्रभुणे, विठ्ठल सावंत आदी.


पाली बसस्थानकाचे सर्वेक्षण मूल्यांकन
स्वच्छ स्थानक अभियान ; प्रवाशांशी साधला संवाद
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १९ : पाली बसस्थानक हे कोकण विभागातील एक प्रमुख बसस्थानक असून, ते मुंबई-गोवा व मिऱ्या-नागपूर या दोन मुख्य राष्ट्रीय महामार्गांवर असल्याने कायमच कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, गोवा, तळकोकण यासोबतच मुंबई विभागातील प्रवाशांसाठी मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळखले जाते. याकरिताच त्याचे काही महिन्यांपूर्वी अत्यंत दर्जेदार असे नूतनीकरण करून प्रवाशांच्या सेवेत सुसज्ज केले आहे, असे प्रतिपादन रायगड विभागीय वाहतूक अधीक्षक मनीषा पाटील यांनी केले.
पाली बसस्थानकाचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागाच्या विभागीय वाहतूक अधीक्षक मनीषा पाटील, रायगड विभागीय कर्मचारी वर्ग, अधिकारी सुहास कांबळे यांनी पाहणी करून सर्वेक्षण करून मूल्यांकन केले. यावेळी त्यांनी बसस्थानकाचा परिसर, पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, व्यावसायिक आस्थापना यांनी प्रवाशांशी संवाद साधत पाहणी करून मूल्यांकन केले. या सर्वेक्षणासाठी पालीतील प्रतिष्ठित नागरिक सरपंच विठ्ठल सावंत, अ‍ॅड. सागर पाखरे, पोलिसपाटील अमेय वेल्हाळ, धनंजय चव्हाण यांनी सर्वेक्षणातील मुद्द्यानुसार गुणात्मक मूल्यांकन करून अभिप्राय नोंदविले आहेत. या वेळी लांजा स्थानकप्रमुख भाग्यश्री प्रभुणे, पाली बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रदीप सावंत, सुनील माळी उपस्थित होते.

चौकट
सीसीटीव्ही, पे अॅण्ड पार्किंगची सुविधा
पाली बसस्थानक हे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे व मध्यवर्ती असल्याने कायमच प्रवाशांची रेलचेल असते. बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. बसस्थानक आवारात पे अॅण्ड पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर सेल्फी पॉईंटची व्यवस्था बसस्थानक परिसरात करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: शेतकरी कुटुंबातील अक्षय कवडसेला ॲमेझॉनमध्ये ४६ लाखांचे पॅकेज; महाविद्यालयात आनंदाची लाट

Assault Video : ओयोत चाललंय काय? पोलीस जाब विचारायला जाताच हॉटेलमध्ये नेऊन महिलेनं.....; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Blast Video : गॅस सिलेंडरचा भयंकर स्फोट अन् पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळलं घर; एकाचा जागीच मृत्यू, महिला जखमी, थरारक व्हिडिओ पाहा

RakshaBandhan 2025: दुहेरी योग... नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन; महिलांची बाजारपेठेत राख्या, भेटवस्तू खरेदीसाठी लगबग

Uttarakhand Floods : उत्तराखंडमध्ये अडकलेले अवसरीचे पर्यटक सुखरूप, संपर्क साधला

SCROLL FOR NEXT