कोकण

संगमेश्वर बसस्थानकासह बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य

CD

- rat२०p३.jpg, rat२०p४.jpg-
P२५N६४९८६, २५N६४९८७
पावसामुळे संगमेश्वर बसस्थानक परिसरात साचलेला चिखल.
----
संगमेश्वर बसस्थानकासह बाजारपेठेत चिखल
पावसाचा तडाखा ; गटारे बुजवल्यामुळे पाण्याचा निचरा थांबला, प्रवाशांना त्रास
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २० ः मॉन्सूनपूर्व पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात आगमन झाले आहे. या पावसाने संगमेश्वर बसस्थानक आणि परिसरात चिखलच चिखल निर्माण झाला होता. त्यामधून मार्गक्रमण करणे प्रवाशांसाठी जिकिरीचे झाले होते. बसस्थानक उभारताना गटारे बुजली गेल्याने पाणी निचरा न होता तिथे चिखल साचल्याचे दिसत आहे. यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या वळवाच्या पावसामुळे महामार्गावर जागोजागी तळी साचलेली असतानाच संगमेश्वर येथे महामार्गाचे काम करताना ठेकेदार आणि महामार्ग विभाग यांच्या अक्षम्य चुकांमुळे दररोज वाहतूककोंडी होऊन वाहनचालक आणि पादचाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. संगमेश्वर येथील गटारे एसटी बसस्थानकाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने बुजवल्याने पहिल्याच पावसात चिखलाचे सर्व पाणी संगमेश्वर बसस्थानकासह अनेक दुकानात शिरले. ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्गविरुद्ध तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना चालणेही मुश्किल झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास संगमेश्वरवासियांना आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
चाकरमानी गावी आल्यामुळे संगमेश्वर बसस्थानकात सध्या प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. अशा स्थितीत प्रवाशांना बसस्थानकात पसरलेल्या चिखलाच्या साम्राज्यामुळे चालणे आणि वाहतूक नियंत्रकांच्या खिडकीजवळ चौकशीला येणंही अशक्य झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित ठेकेदाराने संगमेश्वर बसस्थानक आणि बाजारपेठेतील चिखल काढून हा सर्व परिसर स्वच्छ करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील काही दिवसात मोसमी पाऊस सुरू होत आहे. जिल्ह्यात सुरुवातीला जोरदार पाऊस पडत असल्याने गटारे मोकळी केली नाहीत तर अडचण होऊ शकते. पाण्याचा निचरा झाला नाही तर आणखीन अडचणी निर्माण होतील. नियमित प्रवास करणारे प्रवासी तसेच विद्यार्थी यांना प्रवास करणे धोक्याचे होईल. पाणी साचून राहिल्यास प्रवाशांना उभे राहणेही अशक्य होईल. त्यामुळे याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
----
कोट
एसटी बसस्थानकातील गैरसोयींवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत. पहिल्या पावसाने झालेल्या चुका लक्षात आलेल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी पुढील आठ दिवसांमध्ये योग्य ती पावले एसटी महामंडळाने उचलली पाहिजेत. तसे न केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही.

- संतोष थेराडे, संगमेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: भारताचे ओपनर माघारी परतले! Shubman Gill ने पुन्हा मैदान गाजवले; गावस्कर, सोबर्स यांचा विक्रम मोडला

Latest Maharashtra News Updates : जळगावच्या पाचोर्‍यातील महसूल विभागामार्फत महसूल सप्ताहाचे आयोजन

'ठरलं तर मग' मालिकेसाठी आजीची गोंडस विनंती, व्हिडिओ पाहून जुई गडकरी म्हणाली... 'आजी, किती गोड...'

Canada Study Permit: कॅनडामध्ये स्टडी परमिटशिवाय शिक्षणाची परवानगी; कोण पात्र? काय आहेत नियम? वाचा, एका क्लिकवर

Yuzvendra Chahal: इंग्लंडच्या मैदानात चहलचा जलवा! ६ फलंदाजांना अडकवलं फिरकीच्या जाळ्यात; पाहा Video

SCROLL FOR NEXT