कोकण

जीवनाची ''त्रिसूत्री'' आत्मसात करा

CD

swt201.jpg
65023
पणदूर ः शिवाजी इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत ९८.४० टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या यशिका परब हिचा सन्मान करताना उद्योजक पुष्कराज कोले. बाजूला नागेंद्र परब व अन्य. (छायाचित्र ः अजय सावंत)

जीवनाची ‘त्रिसूत्री’ आत्मसात करा
सखाराम गिरपः पणदूर तिठा विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २०ः जीवनात यशस्वी होण्याचे शालेय शिक्षण, व्यक्तिमत्व विकास व कौशल्य विकास हे तीन मंत्र आहेत. ते आत्मसात करून वाटचाल करा, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक सखाराम उर्फ बापू गिरप यांनी केले. वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय (कै.) शशिकांत अणावकर विद्यानगरी पणदूर तिठा येथे आयोजित दहावी, बारावी विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.
या सोहळ्याला निवृत्त असिस्टंट मॅनेजर, स्टेट बँक ऑफ इंडिया, रोटरी क्लब, गोरेगाव, मुंबईचे माजी अध्यक्ष व गेली १५ वर्षे व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत असलेले बापू गिरप यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्योजक व दादासाहेब तरोडकर अकादमीचे अध्यक्ष पुष्कराज कोले हे प्रमुख अतिथी तर अध्यक्षस्थानी आपासाहेब गावडे, नागेंद्र परब, श्रीमती सावंत, मुख्याध्यापक श्री. गावकर उपस्थित होते.
श्री. गिरप म्हणाले, "विद्यार्थ्यांचा पालकांसोबत होणारा गुणगौरव कौतुकास्पद आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत असताना जीवनात यशस्वी होण्याचे शालेय शिक्षण, व्यक्तिमत्व विकास व कौशल्य विकास हे तीन मंत्र आहेत. स्पर्धा परीक्षा तयारीचे दिव्य पार केल्यावर तुम्ही यशस्वी व्हाल. स्वतःला कधीही कमी लेखू नका. मी माझ्यासाठी खास आहे, हा मूलमंत्र लक्षात ठेवून वाटचाल करा."
पुष्कराज कोले यांनी, सिंधुदुर्ग ही दात्यांची भूमी आहे. आपले गुण जोपासा. स्वतःचे कशा पद्धतीने सादरीकरण करणार, ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे, असे मत व्यक्त केले. पालकांच्या उपस्थितीबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (कै.) अणावकर सरांनी रोवलेला पाया भक्कम करून त्यांचा हा वारसा असाच पुढे न्यावा, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Reserves: अनेक जिल्ह्यांत सापडले सोन्याचे साठे; राज्याचं भविष्य बदलणार, किती आहे सोनं?

Latest Marathi News Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक भागात साचलं पाणी

Vande Bharat Express: देशातील लांब पल्याची वंदे भारत महाराष्ट्रात; प्रवाशांसाठी आरामदायक, पुणे नागपूर ठरली सर्वाधिक दूरची रेल्वे

Pune Crime : तुझे अनैतिक संबंध, तलाक दे नाही तर... पुण्यात भरचौकात तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला

'सगळ्यांनी माझं हसू केलं, पण आता...' अभिषेक बच्चनसाठी बिग बींची भावूक पोस्ट, म्हणाले...'त्या थट्टेची जागा...'

SCROLL FOR NEXT