मुंबई पुण्यासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस होईल आणि त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा सुद्धा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला.