केवळ फोटो
पावसाने आठवडा बाजाराची दैना
रत्नागिरी ः मंगळवारी दुपारी आणि सायंकाळी पडलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात सर्वांची तारांबळ उडाली. त्याचा सर्वाधिक फटका लांजा आणि रत्नागिरीतील आठवडा बाजाराला बसला. जोरदार वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसापासून भाजी सुरक्षित राहावी यासाठी भाजीविक्रेत्यांची तारांबळ उडाली होती. ताडपत्री असलेल्यांनी तातडीने दुकानावर त्याचे छत तयार केलं; मात्र काही दुकानदारांची भाजी पावसाच्या पाण्यात पडून वाहून गेली. पावसाळी वातावरणामुळे बाजार भरलेला असूनही ग्राहक तुरळक होते. रत्नागिरीतील आयटीआयसमोर भरणारा बाजार आणि लांजातील मध्यवर्ती ठिकाणी सुमारे शंभरहून अधिक दुकानदारांना पावसाचा फटका बसला. त्याची चित्रमय झलक....
- rat20p३२.jpg-
25N65088
रत्नागिरी ः आठवडा बाजारात भरलेले पाणी.
- rat20p२८.jpg-
25N65084
लांजा ः आठवडा बाजारातील किरकोळ भाजीविक्रेत्यांना छत्र्यांचा आधार घ्यावा लागला.
- rat20p२९.jpg-
P25N65085
लांजा बाजारात पावसामुळे पाणी आल्याने व्यापाऱ्यांची धावपळ झाली.
- rat20p३०.jpg-
25N65086
लांजा बाजारपेठेतून वाहणारे पाणी.
- rat20p३१.jpg-
P25N65087
रत्नागिरी ः रत्नागिरी आयटीआय येथील आठवडा बाजारात पाणी भरल्याने व्यापाऱ्यांची सामान उचलण्यासाठी तारांबळ उडाली.
- rat20p३३.jpg-
P25N65089
आठवडा बाजारात भरलेल्या पाण्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
- rat20p३४.jpg-
25N65090
ऊन आणि पावसापासून संरक्षणासाठी घातलेले प्लास्टिकचे आच्छादनही उडाल्याने व्यापाऱ्यांचा माल भिजला.
- rat20p३५.jpg-
25N65091
पावस ः पावस येथे आलेल्या पावसाने दुचाकीस्वारांनाही छत्रीचा आधार घ्यावा लागला.
- rat20p३६.jpg-
P25N65092
अचानक आलेल्या पावसाने पावस बाजारपेठेत आलेल्या दुचाकीस्वारांना दुकानांचा आश्रय घ्यावा लागला.
(छाया ः हेरंब काळे, रत्नागिरी)
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.