कोकण

नेवरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मारली महावितरणवर धडक

CD

नेवरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी
मारली महावितरणवर धडक
सातत्याने खंडित वीजपुरवठ्यामुळे तीव्र संताप
रत्नागिरी, ता. २१ : गेले १५ दिवस वादळीवारा व पावसामुळे नेवरे पंचक्रोशीत वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसामुळे महावितरणच्या कारभारावर ग्रामस्थ संतापले असून, त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. अधिकाऱ्यांना घेराओ घातला. गेले काही दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. याचा फटका जिल्ह्यात ग्रामस्थांना तसेच छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना बसत आहे. पावसाने त्रस्त झालेले ग्रामस्थ आता महावितरणच्या अनागोंदी कारभाराला कंटाळले आहेत. नेवरे पंचक्रोशीत मंगळवारी (ता. २०) संध्याकाळी गायब झालेली वीज महावितरणच्या कारभारामुळे अजूनही गायबच आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांसह महिला, ज्येष्ठ नागरिक महावितरणच्या नावाने शिमगा करत आहेत. बिलांच्या थकबाकीवरून दारात दाखल होणारे महावितरणचे कर्मचारी ग्रामस्थांच्या समस्येवेळी विलंब लावताना दिसत आहेत. या सर्व प्रकारांना ग्रामस्थ वैतागले आहेत. याकडे महावितरणने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. दुकानदारांचे प्रचंड नुकसान होत आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या.


यंत्रसामग्री खरेदीसाठी दरपत्रक द्या
रत्नागिरी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक यंत्रसामुग्रीची कोटेशन पद्धतीने विक्री करावयाची आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपल्या निविदा बंद पाकिटातून संस्थेच्या कार्यालयात ३१ मे रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत साहित्याची समक्ष पाहणी करून आणून द्यावेत, असे आवाहन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेत दहशतवादविरोधी दिवस
रत्नागिरी : जिल्हा परिषद येथे दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवस साजरा करण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांच्या उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा घेऊन दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway: आनंदाची बातमी! भारतीय रेल्वेकडून तीन नव्या गाड्यांची घोषणा; कसा असणार मार्ग?

Yashwant Factory: यशवंतची धुराडी कधी पेटणार?: 'जमीन-विक्री प्रकरणात उच्च न्यायालयात बहुतांश प्रतिवादी अनुपस्थित'; 'तारीख पे तारीख'

Side Effects Smartphone Overuse: तुम्हीही स्मार्टफोनचा अतिवापर करता का? जाणून घ्या 'हे' गंभीर परिणाम आणि उपाय!

Ahilyanagar News: कांदा लिलावात शेतकऱ्यांचा एल्गार! 'अहिल्यानगर हमाली दरवाढीचा विषय'; पाच तास लिलाव बंद

Mahadevi Elephant: 'महादेवी हत्तीसाठी मंगळवेढा-कोर्टी सायकलवारी'; हत्तीची प्रतिकृती ठरली लक्षवेधी ठरली

SCROLL FOR NEXT