कोकण

गवळी समाजाने संघटीतपणे विकास साधावा

CD

65779

गवळी समाजाने संघटीतपणे विकास साधावा

अजय बिरवटकर ः माडखोलमध्ये जिल्हा मेळावा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २३ ः महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे काम कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील गवळी समाजाने संघटीत राहून समाजाचा विकास साधावा. जिल्ह्यात गवळी समाज भवन उभारण्यासाठी सुरुवातीला जागा खरेदीसाठी स्वतः वैयक्तिक आर्थिक सहकार्यासह त्यानंतर ट्रस्टतर्फे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांनी दिली.
महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या १७ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त माडखोल येथील रुद्र सभागृहात गवळी समाजाच्या जिल्हा मेळावा आयोजित केला होता. यावेळी श्री. बिरवटकर बोलत होते. व्यासपिठावर महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे उपाध्यक्ष युवराज गवळी, विश्वस्त विजय गवळी, शाहूवाडी कार्याध्यक्ष खेतल, रुद्र गवळी, महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष दशरथ शृंगारे, उपकार्याध्यक्ष बयाजी बुराण, सचिव नामदेव गो. गवळी, खजिनदार सिताराम केळुसकर, सहसचिव रामचंद्र भालेकर, सदस्य बाबुराव भालेकर, रामदास बुराण, विश्राम केळूसकर, कृष्णा पंदारे, प्रशांत हनपाडे, सुरेश वरेकर, प्रशांत बुराण, सिताराम गवळी, चंद्रसेन लाड, चंद्रकांत चिले, निकिता गवळी, अमिषा गवळी, सल्लागार शंकर काटाळे आदी उपस्थित होते.
ट्रस्टचे कार्य विद्यार्थी प्रगतीसाठी केंद्रित असून समाजातील जुन्या कालबाह्य आणि महिलाबाबतच्या वेदनादायक रूढी परंपररांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी कला कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसह संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात गवळी समाजाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल युवा आर्टीस्ट ओटवणेचे सुपुत्र रोहित वरेकर याला ट्रस्टचा ‘गवळीरत्न’ पुरस्कार श्री. बिरवटकर यांच्या हस्ते प्रदान केला. महिलांसाठी आयोजित ‘खेळ पैठणी’चा आणि लहान मुलांचा संगीत खुर्ची या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खेळ पैठणीमध्ये सौ. सुजाता काटाळे विजेत्या ठरल्या. सौ. रक्षा कोटकर आणि सौ. दिक्षा शृंगारे या संयुक्तपणे द्वितीय विजेत्या ठरल्या. यावेळी रांगोळी व वक्तृत्व स्पर्धाही झाल्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविले. बाबुराव भालेकर यांनी प्रास्ताविक केले. बयाजी बुराण, दशरथ शृंगारे यांनी सूत्रसंचालन केले. रामदास बुराण यांनी आभार मानले.
-----------------
विविध मान्यवरांचा सत्कार
यावेळी ''ऑपरेशन सिंदूर''मध्ये मिळवलेल्या यशाचे औचित्य साधून गवळी समाजातील प्रवीण गवळी (माडखोल), संतोष गवळी (ओटवणे), निखिल केळुसकर (सोनुर्ली), संतोष वाजवे (वसोली कुडाळ), सुरेश पंदारे (आंजिवडे कुडाळ) या आजी व माजी सैनिकांचा तसेच वैभववाडी कॉलेजच्या प्राचार्यपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल कारिवडेचे प्रा. नामदेव गवळी, राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल आंबेगाव येथील प्रकाश केळुसकर, वयाच्या ६० व्या वर्षी कला स्नातक (राज्यशास्त्र) ही पदवी संपादन केल्याबद्दल शंकर काटाळे, पोलिस पाटील पदावर नियुक्ती झाल्याबद्दल संदीप मोगम (सोनुर्ली), यशवंत दळवी (कुसुर), वैभव यादव (श्रावण), अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सौ. प्राजक्ता हनपाडे, वकील पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या योगिता बुराण व निर्मला बुराण, सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा क्षेत्रातील प्रतिष्ठीत क्रीडादूत पुरस्कार प्राप्त बयाजी बुराण तसेच गुणवंतांचा सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : अंबाझरी तलावाच्या मध्यभागी जाऊन ध्वजारोहण करत जलतरणपटूनी केला वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र दिन साजरा

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT