कोकण

रत्नागिरी भाजपतर्फे निबंध स्पर्धा

CD

रत्नागिरी भाजपतर्फे
निबंध स्पर्धा
रत्नागिरी, ता. २३ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती ३१ मे रोजी आहे. त्यानिमित्त रत्नागिरी शहर भाजपच्यावतीने रत्नागिरी शहर मर्यादित खुल्या गटासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांनी २६ मेपर्यंत निबंध द्यावेत.भाजपा शहराध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे पुरस्कृत आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली. स्पर्धेसाठी देशभक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श प्रशासक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान हे दोन विषय दिले असून यातील एकावर निबंध लिहायचा आहे. शब्दमर्यादा १००० ते १२०० आहे. स्पर्धकांनी नाव, पत्ता, मोबाईल नंबर स्वतंत्र कागदावर लिहावा. निबंध २६ मेपर्यंत अ‍ॅप्पल ब्लॉसम, रामआळी, रत्नागिरी किंवा भाजप कार्यालय, प्रमोद महाजन क्रीडांगण शेजारी, आठवडा बाजार रत्नागिरी या पत्त्यावर द्यावेत. सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन हस्ते गौरविण्यात येईल. पारितोषिक वितरण २७ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता भाजप जिल्हा कार्यालयात होईल. अधिक माहितीसाठी नीलेश आखाडे यांच्याशी संपर्क साधावा.
--------
शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी
३१ मेपर्यंत काढून घ्या
पावस ः रत्नागिरी जिल्ह्यातील प्रलंबित सर्व खातेदार व पीएम किसान योजनेतील लाभार्थी यांनी ३१ मे २०२५ अखेर अॕग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी पूर्ण करून आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. नोंदणी करण्यासाठी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे. तसेच सीएसस्सी केंद्र आणि कृषी विभाग/महसूल विभाग/ग्रामविकास विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्यामार्फत ग्रामस्तरावर नोंदणीचे काम सुरू असल्याने त्यांच्याशी संपर्क करून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. अकराव्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यात सुमारे ४ लाख ८७ हजार ९३६ खातेदार असून या योजनेंतर्गत आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण २ लाख ११ हजार शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. जिल्ह्यातील १ लाख ७१ हजार ६३६ शेतकऱ्यांची पीएम किसान योजनेंतर्गत लाभार्थी म्हणून नोंदणी झाली आहे. या अॕक्टिव पी. एम. किसान लाभार्थीपैकी आजअखेर १ लाख २३ हजार १४ लाभार्थीची अॕग्रीस्टॅकमध्ये नोंदणी झाली आहे. कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे विविध योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी ३१ मेअखेर १०० टक्के नोंदणी करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT