कोकण

शुक नदी पुलावरुन अखेर एकेरी वाहतूक

CD

65897

शुक नदी पुलावरुन अखेर एकेरी वाहतूक

आठवडाभरात पूर्ण क्षमतेने; ‘तळेरे-कोल्हापूर’ बंदची नामुष्की टळली


सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २३ ः येथील शुकनदीवर नव्याने बांधलेल्या पुलावरून आज दुपारनंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद होण्याची नामुष्की टळली. पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होण्यास अजूनही आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील तळेरे-गगनबावडा मार्गावरील काँक्रीटीकरणाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. या मार्गावरील करूळ, शांती नद्यांवरील पुलांची कामे पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरू आहे. मात्र, शुकनदीवरील पुलाचे काम अजुनही सुरू होते. त्यातच ऐन पावसच्या तोंडावर शुकनदी ते शांतीनदीपर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी संपुर्ण रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे शांती नदी ते शुक नदीपर्यंतचा सर्व रस्ता चिखलमय आहे. शुक नदीवरील पुलाचे काम सुरू असल्यामुळे जुन्या सोनाळीमार्गाचा सध्या पर्यायी मार्ग वापर करण्यात आला आहे. तेथे नदीवर लहान पाईप घालून त्यावरून सध्या वाहतूक सुरू होती. मात्र, जिल्ह्यात गेले दोन तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी, नाले प्रवाहीत होण्यास सुरूवात झाली आहे. शुक नदी देखील प्रवाहीत झाली असून आज सायंकाळपर्यंत पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. शुक नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे पर्यायी मार्गावरील मोरी पाण्याखाली जाण्याची शक्यता होती. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक ठप्प होण्याची नामुष्की ओढवणार होती. त्यामुळे गेले दोन दिवस शुकनदीवरील पुलानजीक भराव करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. जेसीबी, पोकलॅन आदींसह विविध मशीन्सचा वापर करून पुल आणि रस्त्यामधील भराव केला जात आहे. दरम्यान, आज दुपारी एकेरी वाहतुक सुरू करण्याइतपत भराव पूर्ण झाला. त्यामुळे तेथून एकेरी वाहतुक सुरू केली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्पची नामुष्कीही टळली आहे. संपूर्ण काम पूर्ण होण्यास अजूनही आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सरंक्षक भिंतीचे कामही अपुर्ण आहे.
------------------
चिखलाचे साम्राज्य
एकेरी वाहतूक सुरू झाली असली तरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल पसरला आहे. त्यामुळे दुचाकी चालविणे मुश्किल झाले आहे. एकीकडे चिखलाचा रस्ता आणि दुसरीकडे अर्धा रस्ता खोदला असल्यामुळे येथून वाहतूक धोकादायक ठरणार आहे.
-----------------
चार महिन्यांनी मुख्य रस्त्याने वाहतूक
तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील शुक नदीवरील पुल हे सर्वांत मोठे आहे. या मार्गावरील जुने पुल २३ जानेवारीला पाडले. तिथंपासून मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद केली होती. आज पुन्हा मुख्य रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माळशेज घाटमार्गे पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणते? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

मला सारखा सारखा फोन नका करू, मी आता देशाचा मुलगा; अभिजीत दीपके वडिलांना असं का सांगितलं?

Nashik Dam Water Level Latest Update : आबादानी! धरणसाठा पोहोचला 79 टक्क्यांवर, आठ दिवसांतील पावसाचा परिणाम; 24 पैकी 14 धरणांमधून विसर्ग सुरूच

Latest Marathi News Live Update : माळशेजघाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

मुलींना शिकवण्याआधी आजी-आजोबांना शिकवा... नीना गुप्तांनी सांगितला 'पंचायत' दरम्यानचा किस्सा; म्हणाल्या, 'ज्या गावात...'

SCROLL FOR NEXT