कोकण

मळगाव शाळेसमोरील रस्ता खड्डेमय

CD

66035

मळगाव शाळेसमोरील रस्ता खड्डेमय

‘बांधकाम’चे दुर्लक्ष; डांबरीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः सावंतवाडी-रेडी मार्गावरील मळगाव बाजारपेठ येथे शारदा विद्यालयासमोर असलेल्या गतिरोधकानजीक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सध्या सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे या खड्ड्यांत पाणी जाऊन रस्त्यावर संपूर्ण चिखल पसरला आहे. या धोकादायक रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
या चिखलमय रस्त्यावरून वाहनधारकांना वाहने चालविताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या हे खड्डे लहान असले, तरी पुढे येणाऱ्या पावसाळ्यात ते अधिक मोठे होण्याची शक्यता असल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहधारकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सावंतवाडी-रेडी मार्गावर मळगाव बाजारपेठ येथील शारदा विद्यालयासमोर असलेल्या गतिरोधकाशेजारी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लहान-मोठे खड्डे पडले आहेत. या भागातील रस्त्यावरील डांबरही उखडल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखल व माती पसरली आहे. त्यातच गेले चार दिवस पडलेल्या मॉन्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांत पाणी साचून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गावरून वाहनांचीही रोज मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. या खड्ड्यांमुळे व चिखलामुळे चालकांना येथून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. गतिरोधकाला लागूनच खड्डे पडल्याने व चिखलामुळे वाहने घसरून या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या लहान असलेले हे खड्डे पावसाळ्यात अधिक मोठे होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी एखादा अपघात झाल्यावर बांधकाम विभागाला जाग येणार का, असा प्रश्न वाहनधारक व ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देऊन हे खड्डे डांबरीकरण करून बुजवावेत व रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा, अशी मागणी वाहनधारक आणि मळगाव ग्रामस्थांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : मुख्यमंत्री मद्यप्राशन करून विधानसभेत पोहोचले? अकाली दलने शेअर केला व्हिडीओ, डोपिंग टेस्टची मागणी...

Thane: ठाण्यात पहिल्यांदाच डबल डेकर बस धावणार, कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार?

Crime: जमिनीच्या वादातून तरुणाला संपवलं; नंतर मृतदेहाची जंगलात विल्हेवाट, ठाण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला अटक, १२ वर्षांनी गूढ उलगडलं

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी...४३ अंशांच्या तडाख्यानंतर जिल्हावासीयांना सुखद दिलासा!

Anewadi Toll Traffic Jam : पुणे-बंगळुरू हायवेवर 5 किमीच्या रांगा! आनेवाडी टोलवर मुंबई–पुण्यातील चाकरमानी अडकले; सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर प्रचंड गर्दी

SCROLL FOR NEXT