कोकण

ऐन पावसाळ्यात नाधवडेत टंचाई

CD

ऐन पावसाळ्यात
नाधवडेत टंचाई
वैभववाडी ः नाधवडे-बौद्धवाडी येथील ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर तत्काळ उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. नाधवडे बौद्धवाडीला पाणीपुरवठा करणारी स्वतंत्र नळयोजना आहे. १९ मे रोजी नळयोजनेच्या मोटारमध्ये बिघाड झाल्यामुळे नळयोजना बंद पडली. त्यामुळे नळयोजनेच्या विहिरीत मुबलक पाणीसाठा असूनही नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईबाबत नाधवडे सरपंच लीना पांचाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वाडीच्या नळयोजनेसाठी दोन मोटारी आहेत. मात्र, विजेच्या कमी-अधिक दाबामुळे त्या दोन्ही मोटारी जळल्यामुळे दुरुस्तीसाठी दिल्या आहेत. लवकरच पुरवठा सुरू होईल.
--
‘रानमाणूस’ गावडेंना
गौरव पुरस्कार घोषित
सावंतवाडी ः कोकणी रानमाणूस तथा पर्यावरण अभ्यासक प्रसाद गावडे यांना यूआरएल फाउंडेशनचा सामाजिक गौरव पुरस्कार घोषित झाला आहे. रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गुरुवारी (ता. २९) मुंबईच्या माटुंगा यशवंत नाट्य मंदिरात आयोजित सोहळ्यात वितरण होणार आहे. चांगल्या पगाराची इंजिनिअरची नोकरी सोडून श्री. गावडे कोकणची संस्कृती आणि विशेषतः पर्यावरणीय मूल्य जपण्याचा संदेश ‘यू ट्यूब’ चॅनेलच्या माध्यमातून देत आहेत. ‘इको-टुरिझम’च्या माध्यमातून कोकणात रोजगाराची संधी निर्माण करून वेगळा आदर्श निर्माण केला.
---------
न्हावेली-मातोंड
रस्ता चिखलमय
सावंतवाडी ः माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर न्हावेली-मातोंड चिरेखाण हा अंदाजे अडीच किलोमीटरचा रस्ता ठेकेदाराने अपूर्णावस्थेत ठेवल्यामुळे कोसळलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे चिखलमय बनला आहे. संबंधित ठेकेदाराकडून नवीन रस्ता बनविण्यासाठी जुन्या रस्त्याचा जेसीबी आणून खोदाई करून घेतली आणि अर्धवट स्थितीत सोडून दुसऱ्या कामासाठी यंत्रसामग्री घेऊन गेल्याने रस्ता पूर्णपणे उखडलेल्या स्थितीत राहिला. त्यानंतर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता अक्षरक्षः चिखलमय बनला. त्यामुळे वाहनधारकांना प्रवास करणे धोकादायक बनले असून याबाबत नागरिकांनी ठेकेदारावर संताप व्यक्त केला. याची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही दिला.
----
पावशीत उद्या
रक्तदान शिबिर
कुडाळ ः तालुक्यातील पावशी येथील बेल नदी ग्रुपतर्फे मंगळवारी (ता. २७) सकाळी ९ ते १२.३० या कालावधीत शांतादुर्गा मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराचे सलग वर्ष १८ वे असून गेल्या सतरा वर्षांत सुमारे १२०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्याला हातभार लावला आहे. बहुसंख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन संजय कोरगावकर, पप्या तवटे यांनी केले आहे.
--------------
वेंगुर्लेतील मॅरेथॉन
आता ५ जूनला
वेंगुर्ले ः वेंगुर्ले नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २५ ला ‘स्वच्छ वेंगुर्ला दौड’ आयोजित केली होती. मात्र, ‘ऑरेंज अलर्ट’ असल्यामुळे यात बदल करण्यात आला असून संबंधित दौड ही जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जूनला घेण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन दौडीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेने केले आहे.
-------------
संजय घोगळे उद्या
आकाशवाणीवर
वेंगुर्ले ः येथील रहिवासी, तसेच जिल्ह्याचे अप्पर कोषागार अधिकारी आणि मालवणी व्यंगचित्रकार संजय घोगळे यांची आकाशवाणी सिंधुदुर्ग या चॅनेलवर ‘व्यंगचित्रकला’ विषयावर मंगळवारी (ता. २७) सायंकाळी ५.३० वाजता गीतांजली जाधव यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होणार आहे. मुलाखत ‘एफएम १०३.६’ वाहिनीवर ऐकता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : अंबाझरी तलावाच्या मध्यभागी जाऊन ध्वजारोहण करत जलतरणपटूनी केला वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र दिन साजरा

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT